मुंबईत पूल कोसळल्याने रेल्वे वाहतूक ठप्प, ५ जण जखमी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : अंधेरी येथे रेल्वेस्थानकाजवळील पादचारी पूल कोसळल्याने मोठी दुर्घटना झाली आहे. विलेपार्ले ते अंधेरी दरम्यान असलेल्या गोखले पूलाचा काही भाग अतिवृष्टीमुळे कोसळला आहे. यामुळे पश्चिम रेल्वेची वाहतुक ठप्प झालेली आहे. दुर्घटनेत ५ जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सरकारी दवाखान्यात उपचार सुरु आहेत. मुंबईतील लोकलवर याचा परिणाम होणार आहे. मुंबईतील वाहतुक सुरळीत चालावी याकरता जादा बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. मुसळधार पावसामुळे मदत कार्यात अडथळे येत असून सध्या रेल्वे लाईनवर पडलेला पूलाचा भाग काढण्याचे काम चालू आहे. रेल्वेवाहतूक सुरळीत चालू होण्यास साधारण सहा ते सात तास लागतील असा अंदाज आहे.

Leave a Comment