हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : निर्भया सामूहिक बलात्कार व हत्या प्रकरणातील चारही दोषींची फाशी पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे. पुढील आदेशापर्यंत या चौघांना फाशी देण्यात येऊ नये, असे दिल्लीतील पतियाळा हाउस कोर्टाने स्पष्ट केले. पतियाळा हाउस कोर्टाने निर्भया प्रकरणातील दोषींसाठी फाशीसाठी काढण्यात आलेल्या डेथ वॉरंटवर पुढील आदेशापर्यंत स्थगिती दिली आहे.
2012 Delhi gang-rape case: A Delhi Court stays execution of convicts till further orders pic.twitter.com/jdg28SSDmN
— ANI (@ANI) January 31, 2020
निर्भयाच्या चारही दोषींविरोधात डेथ वॉरंट जारी झाले असून, त्यांना १ फेब्रुवारी रोजी पहाटे ६ वाजता फाशी देण्यात येणार होती. तसेच या आधी चारही आरोपींना २२ जानेवारी रोजी फाशी देण्यात येणार होती. तसे डेथ वॉरंटही बजावण्यात आले होते. मात्र, त्यानंतर दोषींपैकी मुकेश सिंह याने दयेचा अर्ज दाखल केला. तो राष्ट्रपतींनी फेटाळल्यानंतर अन्य आरोपी पवन कुमार याने घटना घडली, त्यावेळी तो अल्पवयीन असल्याचा दावा करणारी याचिका केली. अखेर सर्व याचिका फेटाळून लावल्यानंतर पुन्हा १ फेब्रुवारी रोजी पहाटे ६ वाजता दोषींना फाशी देण्याचे डेथ वॉरंट जारी करण्यात आले, मात्र उद्याचीही फाशी टळली आहे.