बीड, प्रतिनिधी, नितीन चव्हाण : मोदी शहांचा ITसेल रात्रंदिवस विष पेरण्याचं काम करत असल्याची घणाघाती टीका माजी. न्याय मुर्ती बी.जी. कोळसे पाटील यांनी बीड येथे केली. ते बीड येथील संविधान बचाव महासभेत बोलत होते. या देशातील दलित, आदिवाशी- मुस्लिमांनी एकत्र येण्याची गरज आहे. असे मी गेल्या 30 वर्षापासून सांगत होतो. आता आपण एकत्र आलो आहोत. त्याबद्दल मी मोदींचे आभार मानतो, त्यांनी आम्हाला एकत्र येण्याची संधी दिली. आम्ही एकत्र आल्यामुळे आता मोदी-शहाची वाट लागणार आहे. मोदी शहा हे आरएसएसचे दलाल आहेत. आणि आरएसएस देशाचा आणि हिंदुंचा दुष्मन आहे, अशी टीका कोळसे पाटील यांनी केली.
पुढे बोलतांना ते म्हणाले की, जनशक्ती सक्षम असेल तर सरकार कितीही क्रुर लोकांचे असो नेते कितीही क्रूर असो त्यांना हार मानावीच लागते. आता आपल्याला जाती व्यवस्था विसरुन मोदी-शहा या गुंडाना हरवायचे आहे. संघ हिंदुंचा दुष्मन आहे. खरच संघाला हिंदुचा पुळका आहे तर सरसंघचालक पदी दुसर कोणी का बसविलं जात नाही.? 70 वर्षे जेवढ देशावर कर्ज झालं नाही. तेवढ कर्ज मोदींनी साडेपाच वर्षात केलं. मोदी शहा जन्मल्यापासून एकदाही खर बोलले नाहीत. देशातल्या सगळ्या दंगली ह्या आरएसएसने घडवून आनल्या आहेत. त्यांना देशात शांतता नकोय. संघाला घाबरु नका आमची जनशक्ती मोठी आहे असेही ते म्हणाले.