‘या’ Multibagger Stock ने 700 टक्क्यांहून जास्त रिटर्न देऊन गुंतवणूकदारांना केले मालामाल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Multibagger Stock : गेल्या आठवड्यात घसरण झालेल्या शेअर बाजारात गेले दोन दिवस तेजी आल्याचे पहायला मिळले आहे. यादरम्यान एचबीएल पॉवर सिस्टीमचे शेअर्सही चर्चेत आले आहे. कारण गेल्या 3 ट्रेडिंग सत्रांमध्ये यामध्ये 25 टक्क्यांनी वाढ झाली आहे. शुक्रवारी देखील यामध्ये मोठी तेजी पाहायला मिळाली. यावेळी हे शेअर्स 11 टक्क्यांच्या वाढीसह 114.65 रुपयांच्या पातळीवर गेल्या एका वर्षातील उच्चांकावर बंद झाले.

Order win helps HBL Power Systems surge 16 per cent - Dalal Street Investment Journal

एका मीडिया रिपोर्ट्स नुसार, HNI डेस्कवरून या शेअर्समध्ये मोठी खरेदी झाली आहे. ज्यामुळे यामध्ये मोठी तेजी आली. किंमतीसोबतच शेअर्सचे वॉल्यूमही वाढले आहेत. गेल्या वर्षी हे शेअर्स 48 रुपयांच्या नीचांकी पातळीवर ट्रेड करत होते. Multibagger Stock

This multibagger stock hits upper circuit; zooms over 550% in one year - BusinessToday

अनेक देशांमध्ये पसरला आहे कंपनीचा व्यवसाय

देशातील औद्योगिक बॅटरीच्या सर्वात मोठ्या उत्पादकांपैकी एचबीएल पॉवर ही एक आहे. ही कंपनी टेलिकम्युनिकेशन्स, यूपीएस, रेल्वे, सोलर, ऑयल अँड गॅस आणि पॉवर इंडस्ट्रीज यासारख्या अनेक क्षेत्रांसाठी बॅटरी बनवते. यामध्ये लीड-एसिड, ट्यूबलर जेल, प्युअर लेड थिन प्लेट आणि निकेल-कॅडमियम सारख्या बॅटरीचा समावेश आहे. एचबीएल पॉवरचा व्यवसाय यूएस, युरोप आणि मध्य पूर्वमधील 80 पेक्षा जास्त देशांमध्ये पसरलेला आहे. तसेच कंपनीचे भारतातील आंध्र प्रदेश आणि तेलंगणा येथे 6 मॅन्युफॅक्चरिंग प्लॅन्ट देखील आहेत. Multibagger Stock

Multibagger Penny Stock: ये 10 पैसे का शेयर बना रॉकेट, 1 लाख रुपये का निवेश हुआ 2 करोड़ - Best Multibagger Stock list Orient paper and industries investors return bse nse share market tuts - AajTak

दोन वर्षांत गुंतवणूकदार झाले मालामाल

गेल्या दोन वर्षात HBL Power Systems Limited ने आपल्या गुंतवणूकदारांना मोठा नफा कमावून दिला आहे. कोरोना महामारीत बाजार कोसळल्यापासून कंपनीच्या शेअर्समध्ये 700 टक्क्यांहून जास्तीने वाढ झाली आहे.

दोन वर्षांपूर्वी 16.20 रुपये किंमत असलेले हे शेअर्स आज 114 रुपयांच्या पातळीवर ट्रेड करत आहे. जर एखाद्याने दोन वर्षांपूर्वी यामध्ये एक लाख रुपये गुंतवले असते तर आज त्याला 7 लाखांपेक्षा जास्त रुपये मिळाले असते. Multibagger Stock

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://hbl.in/

हे पण वाचा :
Central Bank of India ने FD वरील व्याजदरात केले बदल, नवीन दर पहा
WhatsApp चे नवे फीचर, आता लवकरच 1 हजारांहून जास्त लोकांना ग्रुपमध्ये Add करता येणार
Bajaj Finance ने FD व्याजदरात केली वाढ, नवीन दर तपासा
PIB factCheck : केंद्र सरकारकडून ‘या’ योजनेंतर्गत सर्व मुलींना मिळणार 1.50 लाख रुपये, यामागील सत्यता तपासा
Credit Card चा अशा प्रकारे वापर करून मिळवा अनेक फायदे !!!