रक्षाबंधन 2020 । तब्ब्ल 29 वर्षानंतर आला रक्षाबंधन साठी अनोखा मुहूर्त

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । श्रावण महिना सुरु झाला कि , भारतीय संस्कृतीत अनेक सण सुरु होतात. बैलपोळा, नागपंचमी, रक्षाबंधन असे अनेक सण साजरे केले जातात. सण असले कि आपोआपच घरातील वातावरण आनंददायी होते. भारतीय संस्कृतीत सण , सभारंभामध्येच सर्वत्र एकत्र येतात आणि आनंद लुटतात. रक्षाबंधन हा बहीण भावांचा आनंदाचा सण असतो. परंतु या वर्षी मात्र कोरोनाच्या काळात हा सण साजरा करण्यावर बंधन येणार आहेत. या वर्षीचा जो रक्षाबंधनाचा जो मुहूर्त आहे . तो तब्ब्ल २९ वर्षांनंतर असा मुहूर्त लाभला आहे.

या वर्षी चा रक्षाबंधन हा ऑनलाईन माध्यमातून साजरा करण्याचा तरुणाचा मानस आहे . कारण लॉक डाउन मुळे कोणी कुठे जाऊ शकत नाही. ३ तारखेला येणारा रक्षाबंधन हा श्रावण महिण्यात आला आहे. त्या दिवशी श्रावण महिन्यातील पौर्णिमा बरोबर श्रावण नक्षत्र पण त्याच दिवशी येत असल्याने या वर्षीचा रक्षाबंधन शुभ मुहूर्तावर आला असे म्हंटले जात आहे.

ज्योतिषाचार्य अनीष व्यास यांनी सांगितलं आहे कि, या वर्षीचा बहीण भावांचा रक्षाबंधन हा सण खूप खास आहे. कारण यावर्षी रक्षाबंधन साठी सर्वार्थ सिद्धि आणि दीर्घायु आयुष्मान चा शुभ संयोग आहे. रक्षाबंधन ला हा शुभ संयोग तब्ब्ल २९ वर्षानंतर आला आहे. त्याबरोबरच भद्रा आणि ग्रहण यांची सावली सुद्धा या वर्षीच्या रक्षाबंधन सणावर पडत नाही. या वर्षी श्रावणातील सोमवारी ३ ऑगस्ट या दिवशी मुहूर्त येत आहे.असेही ते म्हणाले .

Leave a Comment