राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे घंटानाद आंदोलन, गडकिल्यांच्या निर्णयाबाबत सरकारचा निषेध

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी | सरकारच्याकडून गड आणि किल्ल्याच्या बाबतीत घेण्यात आलेल्या निर्णयाबाबतीत सरकारचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीन घंटानाद आंदोलन करण्यात आल. यावेळी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आल. राज्यातील गडकिल्ले महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून किल्ल्यांवर हेरिटेज हॉटेल उभारणी करण्यात येणार असून करारावर हॉटेल व्यावसायिकांना किल्ले देण्यात येणार आहे. अशा 25 किल्ल्यांची यादी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून काढण्यात आली.

याला राज्य मंत्रीमंडळाची मंजुरी मिळताच पर्यटन विभाग पुढचं पाऊल उचलणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीये. सरकारचा हा निर्णय पूर्णतः चुकीचा असल्याचा आरोप करून राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे हे घंटानाद आंदोलन करण्यात आलं.

इतर महत्वाच्या बातम्या –

 

 

 

Leave a Comment