पुणे प्रतिनिधी | पिंपरी चिंचवड येथील एका हाॅटेलमध्ये मुलींचे अश्लिल चित्रिकरण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उच्चभ्रू हाॅटेल मधील वाॅशरुममध्ये छुपा कॅमेरा लावून मुलींचे अश्लिल व्हिडिओ शुट करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. याबाबत हाॅटेलमालकाने पोलिसात तक्रार केल्यानंतर कर्मचार्याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरु आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार, हिंजवडी फेज-1 परिसरातील उच्चभ्रू हॉटेल बी हाईव्ह रेस्टरंटच्या लेडीज वॉशरूममध्ये छुपा कॅमेरा आढळून आला. हॉटेलमध्ये येणाऱ्या मुलींचे अश्लिल चित्रिकरण करण्याच्या हेतू हा कॅमेरा लावल्याचं समजत आहे. ही धक्कादायक बाब समजल्यानंतर खुद्द हॉटेल व्यवस्थापक राकेश शेट्टी यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे.
आरोपी रॅम देब नाथ वय-24, रा.श्रद्धा फॅसिलिटी सर्व्हिसेस, लक्ष्मी चौक, हिंजवडी पुणे याच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आरोपी रॅम देब नाथ हा हाऊस किपिंग म्हणून काम करत होता. त्याने लेडीज वॉशरूममध्ये छुपा कॅमेऱ्यातून मुलींचे चित्रिकरण केले आहे का, याचा तपास करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.