लॉकडाउनमुळे अनेक बहिणींनी बनवली भावासाठी आपल्या हाताने राखी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । दिवसेंदिवस कोरोनाचे संकट गडद होत चालले आहे. देशभर सर्वत्र लॉक डाउन चा काळ सुरु आहे. त्यामुळे अनेक गोष्टींवर याचा परिणाम होत आहे. यामध्ये अनेक सणांवर सुद्धा परिणाम झाला आहे. नेहमीसारखी या वर्षी बाजरात खरेदी साठी ग्राहकांची लगभग दिसत नाही कि कुठे रोषणाई दिसत नाही. त्यामुळे सारे सण खूप सध्या पद्धतीने साजरे केले जाणार आहेत. लॉक डाउन च्या काळात कुठे जायचे नाही कि कोणते काम नाही अश्या लोकांनी आपल्या भावाच्या प्रेमाखातर आपल्या हातानी घरगुती पद्धतीच्या राख्या बनवल्या आहेत.

रक्षाबंधन च्या दिवशी बहीण आपल्या भावाला मनगटावर राखी बांधून आपल्या सुरक्षतेसाठी हमी दिली जाते. या वर्षी कोरोनाच्या काळात बाजारामधून कोणतीही खरेदी करण्यास अनेक जणी घाबरत आहेत. त्यामुळे अनेक जणींनी घरगुती आपल्या भावासाठी राखी बनवली आहेत. सोनारी मध्ये राहणारी चंदा देवी या दरवर्षी राखी खरेदी करतात. पण यावर्षी त्यांनी बाहेरून राखी न घेता स्वतःच्या हाताने राखी खरेदी केली आहे. त्यांनी मोत्याचा साज त्यावर चढवलेला आहे. त्यामुळे ती दिसताना खूप आकर्षक दिसते. त्याच्या मतानुसार भावाला राखी वर प्रेम नसते तर त्याचे जास्त बहिणीवर प्रेम असते.

छत्तीसगड मध्ये राहणाऱ्या अनिता म्हणतात कि, १५० रूपांमध्ये ३० राख्या तयार केल्या जातात. एका आठवड्यात त्यांनी अनेक राख्या बनवल्या आहेत. गेल्या वर्षी शिक्कल राहिलेल्या साधनांपासून त्यांनी या राख्या तयार केल्या आहेत. त्यानी अनेक राख्या कार्टून पद्धतीने बनवल्या आहेत. प्रत्येक भावासाठी त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या राख्या बनवल्या आहेत. त्यांनी आज बाजूच्या अनेक महिलाना पण राख्या विकल्या आहेत. त्यामुळे त्यांना लॉक डाउन च्या काळात पैसे मिळत आहेत. त्यामुळे त्याही खुश आहेत.

Leave a Comment