वडनेर ग्रामिण रुग्णालयाचा भोंगळ कारभार, नागरीकांची कारवाईची मागणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

वर्धा प्रतिनिधी। वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यात येणाऱ्या वडनेर गावात नागरीकांना योग्य आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने शासनाने भव्य सुसज्य बांधले. सोबतच रुग्णांना सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या. मात्र येथील, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षितपणामुळे येथील रुग्णांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. रुग्णालयाच्या भोंगळ कारभारामुळे नागरीकांमध्ये कमालीचा रोष निर्माण झाला आहे.

रुग्णालयातील संपुर्ण प्रकार‌ नागरीकांनी कॅमेऱ्यात कैद केले असता बाह्य रुग्णांची तपासणी दंत चिकित्सक करीत आढळले, औषधी वितरण भागातील कर्मचारी गैरहजर राहतात सोबतच इतर वेळी बाहेरील व्यक्तींना औषधीचे वाटप करीत असल्याचे कॅमेराने टिपले आहे. बी.पी तपासणी विभागातील अधिपरिचारिकेची नेमणूक दुसऱ्या वार्डात केल्याने येथे समुपदेशक हुद्द्यावरील व्यक्ती रुग्णांचे बी.पी तपासणी करीत होते. रुग्णालयात रक्त तपासणीसाठी वापरले जाणारे यंत्र बिघाड झाल्याने बंद आहे. ओ.पी.डी च्या ठिकाणावरील कर्मचारी बेपत्ता होते तर तेथे शिपाई नोंदणीचे काम सांभाळत होते. कर्मचारी नोंदवहित मोठी तफापत आढळून आली. रुग्णालयात कामावर गैरहजर असलेल्या कर्मचाऱ्यांची हजरी लावल्याचे आढळून आले.

हा सर्व‌ प्रकार कॅमेऱ्यात कैद करीत नागरीकांनी जिल्हा चिकित्सक अधिकारी, जिल्हा अधिकारी, खासदार रामदास तडस,आमदार समिर कुणावार यांना निवेदन देऊन दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.तेव्हा नागरिकांच्या मागणीवर प्रशासन काय कारवाई करते याबाबत नागरिक प्रतीक्षा करत आहेत.

Leave a Comment