सल्लू च्या ‘भारत ‘ चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई | बहुचर्चित चित्रपट ‘भारत’ चा फर्स्ट लूक रिलीज झाला आहे. या चित्रपटात अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री कतरिना कैफ आणि दिशा पटानी मुख्य भूमिकेत आहे. चित्रपटाचा निर्माता अतुल अग्निहोत्री याने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून हे पोस्टर शेअर केले आहे.

‘भारत’ च्या पोस्टरमध्ये सलमान आणि कतरिना वाघा-अटारी बॉर्डरच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ उभे दिसत आहेत. या चित्रपटातील कतरिनाचा लूक हा आतापर्यंतचा वेगळा लूक असल्याचे दिसून येत आहे. यात तिने साडी नेसली असून केस देखील कुरळे केलेले आहेत.

सुरुवातीला या चित्रपटात कतरिनाच्या जागी प्रियंका चोप्राची वर्णी लागली होती. मात्र प्रियंकाने शूटींग सुरू व्हायच्या काही दिवस आधीच चित्रपटातून माघार घेतली होती. या चित्रपटाची शुटिंग लुधियाना पासुन २० किलोमीटर दूर बल्लोवालमध्ये करण्यात आली आहे. येथे वाघा-अटारी बॉर्डरचा सेट तयार करण्यात आला आहे.

Leave a Comment