हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याने भारताचा स्टार माजी फलंदाज वीरेंद्र सेहवागवर अत्यंत खालच्या पातळीवर टीका केली आहे. “सेहवाग तुझ्या डोक्यावर जितके केसही नसतील तितके माझ्याजवळ पैसे आहेत”, अशी घणाघाती टीका शोएबने केली आहे. यावर आक्रमक सेहवाग काय उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे.
शोएब अख्तरचं यूट्यूबवर अधिकृत चॅनल आहे. या चॅनलवर शोएब क्रिकेट संदर्भात विश्लेषण करत असतो. या विश्लेषणमध्ये शोएबने भारतीय खेळाडूंच्या कामाचे कौतुक केले होते. त्यावरुन भारताचा माजी खेळाडू विरेंद्र सेहवागने “शोएबला भारतात व्यावसाय करायचा आहे. त्यामुळे तो भारतीय खेळाडूंची स्तूती करतोय”, असा टोला लगावला होता. त्यालाच आता शोएबने उत्तर दिलं.
“माझे चाहते भारतातही आहेत. जेव्हा मी बांगलादेशात जातो तेव्हा फक्त मला बघण्यासाठी रस्त्यावर ट्रॅफिक जमा होते. ऑस्ट्रेलियात तर मी 10 सेकंदही एकटा राहू शकत नाही. त्यामुळे सेहवाग जेवढे तुझ्या डोक्यावर केसही नाहीत त्यापक्षा जास्त माझ्याजवळ पैसे आहेत”, अशा शब्दात शोएब अख्तरने टीका केली.