यवतमाळ जिल्ह्यातील एकबुर्जी फाट्याजवळ होंडा सिटी गाडीला अचानक आग लागल्याची घटना घडली. राळेगावकडून वडकीकडे जात असतांना होंडासिटी सिव्हिकच्या गाडीसमोर गाय आडवी आली. तिला वाचवित असतांना होंडा सिटीच्या ड्रायव्हरन गाडी रोडच्या बाजूला काढण्याचा प्रयत्न केला.
परंतु गाडीचे स्टेरिंग लॉक झाले आणि गाडी झाडावर जावुन आदळली. ही धडक इतकी भीषण होती की गाडीतून धूर निघण्यास सुरवात झाली. तितक्यात गाडीने बघता बघता पेट घेतला. यात गाडी पूर्णपणे जळाली. पण यात सुदैवाने कोणतीही जीवीत हानी झाली नाही. यात तिघे जण सुरक्षितपणे बचावलेत.
नंतर परिसरातील नागरिकांनी ही आग विझवण्याचा प्रयत्न केला तेव्हा बऱ्याच वेळांनंतर ही आग आटोक्यात आली. ड्रायव्हरच्या सतर्कतेमुळं या आगीत हे तीनही नागरिक बचावले त्यामुळं खूप मोठी दुर्घटना टळली .