हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। एलआयसी देशातील सर्वात जास्त विश्वासार्ह कंपनी आहे. सरकार द्वारे संचलित या कंपनीच्या पॉलिसीवर ग्राहकांना अनेक फायदे दिले जातात. वाढत्या महागाईच्या या काळात आपल्या सर्वासाठी हे गरजेचे आहे की आपण आपल्या कष्टाच्या कमाईतील काही रक्कम वाचवून पॉलिसी मध्ये गुंतवणूक केली पाहिजे. आपल्या मुलांचे भविष्य चांगले असावे असे स्वप्न सर्वांचेच असते. भारतीय जीवन विमा निगम (एलआयसी) ची अशीच एक योजना आहे. ज्यामध्ये मुलांच्या गरजांवर लक्ष देण्यात आले आहे. या योजनेचे नाव ‘न्यू चिल्ड्रन्स मनी बँक प्लान’ (LIC NEW CHILDREN’S MONEY BACK PLAN) आहे.
किमान ० वर्षे वयापासून ही पॉलिसी सुरु करता येते, तिचे अधिकतम वय १२ वर्षे आहे. कमीतकमी १,००,०० इतकी रक्कम या यिजनेची आहे. आणि जास्तीतजास्त रकमेची काहीच सीमा नाही आहे. प्रीमियम वेवर बेनिफिट राइडर ऑप्शन उपलब्ध आहे.
पॉलिसीधारकाला १८,२०,२२ वर्षे पूर्ण झाल्यावर सम एश्योर्ड ची २० % रक्कम मिळते. पॉलिसी मॅच्युरिटी च्या वेळी (विमाधारक च्या पॉलिसी मुदतीच्या काळात मृत्यू झाल्यास) पॉलिसीधारकाला विमा राशीची उर्वरित ४०% रक्कम बोनस सहित मिळेल. पॉलिसी मुदतीच्या काळात पॉलिसीधारकाच्या मृत्युच्या स्थितिमध्ये विमा रकमेच्या व्यतिरिक्त निहित साधारण प्रत्यावर्ती बोनस आणि अंतिम अतिरिक्त बोनस दिला जातो. डेथ बेनिफिट संपूर्ण प्रीमियम पेमेंट च्या १०५ टक्के पेक्षा कमी होत नाही.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’