व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

भाजपा युवा मोर्चाच्या घरगुती गौरी- गणपती सजावट स्पर्धेतील विजेत्यांना 1 ग्रॅम गोल्ड

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

भारतीय जनता युवा मोर्चा, महाराष्ट्र प्रदेश व युवा विकास प्रतिष्ठान, कराड यांच्या वतीने आयोजित घरगुती गौरी- गणपती सजावट स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ कन्याप्रशाला मंगळावर पेठ येथे पार पडला. या प्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कराड जिल्हा संघचालक डॉ. मकरंद बर्वे, युवा विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष विष्णू काका पाटसकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कराड जिल्हा कार्यवाहक श्रीकांत एकांडे, भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष सुदर्शन पाटसकर, सीमा घार्गे यांची प्रमुख उपस्थिती होती.

या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्वांना प्रशस्तीपत्र व भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. सजावट स्पर्धेच्या विजेत्यांना प्रथम क्रमांकाला साड्यांची महाराणी पैठणी, द्वितीय क्रमांकाला 1 ग्रॅम गोल्ड मधील राणीहार, तृतीय क्रमांकाला 1 ग्रॅम गोल्ड मधील मंगळसूत्र, चतुर्थ क्रमांकाच्या तिन्ही स्पर्धकांना 1 ग्रॅम गोल्ड मधील ठुशी व स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांना आकर्षक सिल्व्हर गणेश प्रतिमा व सहभाग प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अमृत गिजरे, मंदार शिंदे, सर्वेश उमराणी, कल्पेश पाटसकर, सागर साळुंखे, विशाल हापसे, सागर शिंदे, प्रवीण शिंदे, रोहित शिंदे, सुदर्शन पाटसकर मित्र परिवार व युवा विकास प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.

या स्पर्धेतील विजेत्यांची नावे :-

प्रथम क्रमांक सौ. रुपाली अभिजित माने, द्वितीय क्रमांक सौ. पल्लवी दिलीप कुंभार, तृतीय क्रमांक सौ. सुषमा रामचंद्र आष्टेकर तर  उत्तेजनार्थ सौ. सविता विनोद जाधव, सौ. तेजस्वी सोमनाथ भोसले व सौ. दिव्या रोहित संकपाळ