अबब! PPE किट घालून पळवले 10 कोटींचे सोने; घटना CCTV कॅमेर्‍यात कैद

नवी दिल्ली | जगात वेगवेगळे गुन्हे वेगवेगळ्या स्टाइलने केले जातात. असाच एक गुन्हा दिल्लीमध्ये घडला आहे. यामध्ये सोन्याच्या एका मोठ्या दुकानाला चोरट्यांनी रात्री लुटले. यामध्ये 25 किलो सोनं चोरून नेल्याची नोंद असून त्या सोन्याची बाजारातील किंमत ही दहा कोटीच्या आसपास आहे. विषेश म्हणजे चोरट्यांनी ppe किट घालून चोरी केल्याचे समोर आलेय. अठ्ठेचाळीस तासांच्या आतमध्ये चोराला पकडण्यात दिल्ली पोलिसांना यश आले आहे.

मोहम्मद शेख नुर असे पकडलेल्या चोरट्याचे नाव असून त्याने सोन्याच्या दुकानाच्या शेजारील इमारतीवरून सोन्याच्या बिल्डिंग मध्ये उडी मारत शोरुम मध्ये घुसला. तो दरवाजा तोडून आतमध्ये घुसला. रात्री 9.30 ते पहाटे 3.30 पर्यंत तो आतमध्ये दुकानात होता. चोरी केलेल्या दुकानापासून महोंमद हा जवळच इलेक्ट्रिक दुकानात काम करत होता.

PPE किट हे आरोग्य क्षेत्रात प्रथम पायरीवर काम करणाऱ्या लोकं वापरत असतात. यामुळे PPE किट घातलेल्या लोकांच्या विषयी एक प्रकारचा आदर असतो पण त्याचा उपयोग सुद्धा काही चोरट्या बुद्धीचे लोक अश्या प्रकारे करतील असे दिसून आले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

You might also like