Aadhar Card 10 वर्षांपेक्षा जुने झाले आहे ??? अशा प्रकारे करा अपडेट

Aadhar Card
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Aadhar Card हे आता महत्वाच्या डॉक्युमेंटपैकी एक बनले आहे. याशिवाय कोणत्याही सरकारी कामाचा लाभ घेता येणार नाही. मात्र जर आधार कार्ड जुने झाले असेल तर ते लवकरात लवकर अपडेट करावे लागेल. युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच UIDAI ने नुकतेच याबाबत माहिती देताना म्हटले की,” ज्या कार्डधारकांचे आधार कार्ड 10 वर्षांपेक्षा जुने झाले आहे त्यांनी आपली माहिती अपडेट करणे खूप महत्वाचे आहे. तसेच यादरम्यान, आधार कार्डशी संबंधित कोणतीही माहिती बदलली असल्यास ती देखील या डेटाबेसमध्ये अपडेट करावी लागेल.”

Aadhaar Card Update: Check steps to change linked mobile number on Aadhaar  | Personal Finance News | Zee News

UIDAI ने याबाबत पुढे सांगितले की,”आता आपल्याला Aadhar Card ऑनलाईन देखील अपडेट करता येईल, तसेच जर ते ऑफलाइन अपडेट करायचे असेल तर त्यासाठी आधार केंद्रावर जावे लागेल.” अनेक सरकारी योजनांमध्ये आधारचा वापर केला जातो आहे. अशा परिस्थितीत जर एखाद्या व्यक्तीने या संबंधित योग्य माहिती अपडेट केली नसेल तर त्याला अनेक सुविधांचा लाभ मिळवण्यात अडचण येऊ शकेल. त्यामुळे ज्या आधार कार्डधारकांचे कार्ड 10 वर्षांपेक्षा जुने झाले असेल, त्यांनी ते लवकरात लवकर अपडेट करून घ्यावे.

How To Update Aadhaar Card Online Tips & Guide | Instamojo Blog

Aadhar Card अशा प्रकारे करा अपडेट

myaadhaar या अधिकृत पोर्टलला भेट देऊन आधार कार्डधारकांना आपली माहिती ऑनलाइन अपडेट करता येईल. यासोबतच आपल्या ओळखीचा पुरावा आणि एड्रेस प्रूफशी संबंधित इतर कागदपत्रेही अपलोड करावी लागतील. मात्र, जर एखाद्याला आपली माहिती ऑनलाइन अपडेट करता येत नसेल, तर त्याने आपल्या जवळच्या आधार केंद्रावर जाऊन ती अपडेट करावी. यावेळी सर्व कागदपत्रांच्या फोटोकॉपी जमा कराव्या लागतील.

Aadhaar card lost? How to get it back while being in Covid-19 lockdown |  Mint

‘या’ सरकारी योजनांमध्ये वापरले जाते Aadhar Card

ज्या कार्डधारकांनी गेल्या 10 वर्षांपासून आपले Aadhar Card अपडेट केलेले नाहीत, त्यांनी आपली माहिती पुन्हा तपासून ती अपडेट करून घ्यावी, असे UIDAI कडून नुकतेच सांगण्यात आले आहे. हे लक्षात घ्या कि, सध्या सुमारे 1,100 सरकारी योजनांमध्ये पुरावा म्हणून आधार कार्डचा वापर केला जातो आहे. याशिवाय बँका, एनबीएफसीसह सर्व वित्तीय संस्थांकडूनही ग्राहकांना सुविधा देण्यासाठी आधार कार्डचा वापर केला जातो आहे.

किती शुल्क द्यावे लागेल ???

UIDAI ने असेही म्हटले की, जर एखाद्याला आधार केंद्रावर जाऊन आपल्या आधारमधील माहिती अपडेट करायची असेल तर त्यासाठी त्याला शुल्क भरावे लागेल. तसेच आधार केंद्रावर माहितीची पडताळणी करण्यासाठी फिंगरप्रिंट, फोटो आणि आयरिश स्कॅन करावे लागतील. मात्र, ऑनलाइन माहिती अपडेट करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://myaadhaar.uidai.gov.in/

हे पण वाचा :
Gold Price Today : सोने झाले स्वस्त, चांदी महागली, नवीन दर तपासा
Investment Tips :’या’ सरकारी योजनांमध्ये गुंतवणूक करून नवीन वर्षात मिळवा मोठा नफा
खासगी क्षेत्रातील HSBC Bank कडून FD वरील व्याजदरात वाढ, नवीन व्याज दर तपासा
Pan Card युझर्सनी कधीही करू नये ‘ही’ चूक, अन्यथा भरावा लागेल 10 हजार रुपयांचा दंड
कोरोनाचा धसका!! कंपन्या Work From Home च्या विचारात?? नोकरभरतीवर काय परिणाम होणार?