परभणीत काल पर्यंत १०० कोरोना बाधीतांचा मृत्यू ; जिल्हात ८५ नवीन कोरोना पॉझिटिव्ह

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे

परभणी जिल्हातील कोरोना बाधीतांची आकडेवारी दिवसेंदिवस वाढत असून मृत्युदर ५% पर्यंत आला आहे. काल सायंकाळी ७ पर्यंत जिल्ह्यातील २ कोरोना बांधीतांचा मृत्यु झाला असुन ८५ नवीन कोरोना पॉझीटीव्ह सापडल्याने जिल्हावासीयांच्या चिंतेत भर पडली आहे.

परभणी जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनी दोन हजारांचा आकडा पार केला असुन आजपर्यंत २१७४ कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. शहरी भागासहीत आता कोरोनाने ग्रामीण भागात संसर्ग वाढवला आहे. त्यात आतापर्यंत १०० कोरोना रुग्णांचा मृत्यु झाल्याने मृत्युदर ५ % पर्यंत गेल्याने चिंतेत वाढ झाली आहे. मंगळवार २५ ऑगस्ट सायंकाळी ७ वाजेपर्यंत ८७५ कोरोना बाधीत पूर्णपणे बरे होत घरी गेले असुन त्यात आज ५३ जणांनी कोरोनावर विजय मिळवत कोविड कक्षातुन सुट्टी मिळवलीय. तर ११९९ कोरोना बाधीत आजही जिल्ह्यातील कोरोना कक्षात उपचार घेत आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.