आपली प्रेरणा ज्ञान, सेवा असेल तर पैसा आपोआप धावत येतो : देवेंद्र फडणवीस

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

समाजात टेक्नोलाॅजीमुळे मोठे परिवर्तन होत आहे. संपूर्ण जग तंत्रज्ञानामुळे बदलत आहे. डाॅक्टर हे ग्रामीण भागात जायला तयार नव्हते, तेव्हा टेक्नालाॅजीमुळे माणूस जवळ आणता आला. देशात सर्वात अधिक गुंतवणूक ही आरोग्यावरती होणार आहे. पन्नास वर्षात जेवढे काॅलेज उभारले त्यापेक्षा जास्त 5 वर्षात मेडिकल काॅलेज आपण उभारलेत. प्रेरणा ही ज्ञान आणि सेवाच असली पाहिजे, पैसा आपोआप धावत येईल. याच प्रेरणेने आपण सगळ्यांनी काम करावे, अशी विनंती देवेंद्र फडणवीस यांनी केली.

कृष्णा अभिमत विद्यापीठाचा 10 वा दिक्षांत समारंभ उत्साहात पार पडला. या समारंभात कर्नाटकचे उद्योग मंत्री मुरूगेश निराणी आणि आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांचे सहाय्यक आहेत. 2015 ते 2019 या काळात ते मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे प्रमुख ओमप्रकाश शेटे यांना डी. लिट पदवी प्रदान करण्यात आली.

https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/270472388386993

या कार्यक्रमास महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. अध्यक्षस्थानी कृष्णा अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले होते. तर केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड व भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. कुलपतींचे प्रधान सल्लागार डॉ. वेदप्रकाश मिश्रा, प्र-कुलपती डॉ. प्रवीण शिनगारे, कुलगुरू डॉ. नीलम मिश्रा, कर्नाटकचे उद्योगमंत्री ना. मुरुगेश निराणी, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांचे सहाय्यक ओमप्रकाश शेटे, डॉ. अतुल भोसले, परीक्षा नियंत्रक डॉ. सौ. आर. के. गावकर, कुलसचिव डॉ. एम. व्ही. घोरपडे, व्यवस्थापन मंडळाचे सदस्य श्री. विनायक भोसले, डॉ. सुप्रिया पाटील, डॉ. टी. पूविष्णूदेवी, सौ. स्नेहल मसूरकर, सौ. मनिषा मेघे, दिलीप पाटील, पी. डी. जॉन, डॉ. सबिता राम, डॉ. अक्षता कोपर्डे, डॉ. ज्योती साळुंखे, डॉ. रेणुका पवार, डॉ. स्वप्ना शेडगे, संशोधन संचालक डॉ. अरुण रिसबूड, अतिरिक्त संशोधन संचालक डॉ. डी. के. अगरवाल, कृष्णा हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. ए. वाय. क्षीरसागर, मेडिकल ॲडमिनिस्ट्रेटर डॉ. आर. जी. नानिवडेकर, अधिष्ठाता डॉ. एस. टी. मोहिते, डॉ. शशिकिरण एन. डी., डॉ. वैशाली मोहिते, डॉ. एस्. सी. काळे, डॉ. जी. वरदराजुलू, डॉ. एस. आर. पाटील आदी उपस्थित होते.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, आज माझ्या मनात खंत आहे. एकेकाळी युवापिढी झपाटलेली होती. उच्चशिक्षण घेतल्यानंतर देशाला, गावाला व समाजाची सेवा करण्यास काहीकाळ दिला पाहिजे अशी मानसिकता होती. आता प्रत्येकजण वेगाने पळायला पहात आहे, परंतु समाज मागे राहिला तर त्या वेगाचा उपयोग काय ? एक वेळ अशी येते. समाजातील मोठा वर्ग मागे राहिला तर पुढे गेलेल्यांना प्रगती साधता येत नाही. आपल्याला परिवार असतो, त्यासोबत काही वेळ समाजाला दिला पाहिजे.

पीएच.डी. प्राप्त विद्यार्थी

सौ. झाराश्री साहू, किरण निकम, जयवंत थोरात, सौ. नितांजली पाटील, डॉ. मनिषा लद्दड, डॉ. गौरी शिंदे, शिवाजी पवार, आनंदी बांडे यांना पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली.

कृष्णा अभिमत विद्यापीठाच्या यंदाच्या १० व्या दीक्षांत सोहळ्यात विद्यापीठातील मेडिसिन अधिविभाग (४७६), नर्सिंग (२९७), दंतविज्ञान (१८४), फिजिओथेरपी (१२८), अलाईड सायन्स अधिविभाग (८०) आणि फार्मसी (६२) अशा सहा अधिविभागांतून एमबीबीएस, एमएस, बीडीएस, एमडीएस, बीपीटीएच, एमपीटीएच, बी. एस्सी. नर्सिंग, एम. एस्सी. नर्सिंग, एम. एस्सी. बायोटेक्नॉलॉजी, एम. एस्सी. मायक्रोबायोलॉजी, बी. फार्मसी आदी अभ्यासक्रमांच्या एकूण १२२७ विद्यार्थी-विद्यार्थीनींना पदवी प्रदान करण्यात आली.

 

Leave a Comment