फक्त 167 रुपयांची बचत करून मिळवा 11.33 कोटींचा मोठा फंड; कसे ते जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पैशाची गरज तर सर्वानाच असते. भविष्यात पैशाची कमतरता न पडण्यासाठी कुठे गुंतवणूक करावी असा प्रश्न अनेकांना पडतो. तसेच काही वेळा जास्तीत जास्त रक्कमेची गुंतवणूक करणंही सर्वसामान्य लोकांना परवडत नाही. आज आम्ही तुम्हाला गुंतवणुकीच्या काही मूलभूत तत्त्वांबद्दल सांगत आहोत, ज्याद्वारे तुम्ही कमी वेळात छोट्या गुंतवणुकीने मोठा फंड बनवू शकता.

छोट्या गुंतवणुकीतून मोठा निधी जमा करण्यासाठी योग्य गुंतवणुकीची वेळ निवडणे फार महत्वाचे आहे. म्हणूनच लहानपणापासूनच गुंतवणूकिला सुरुवात करावी असा सल्ला तज्ज्ञ नेहमीच देत असतात. कमी पैशात गुंतवणूक करण्यासाठी तुम्ही एसआयपीद्वारे म्युच्युअल फंडात गुंतवणूक करून तुम्ही दीर्घ मुदतीत करोडो रुपये कमवू शकता.

जर तुम्ही वयाच्या २५ व्या वर्षी SIP द्वारे गुंतवणूक करायला सुरुवात केली असेल आणि जर तुम्ही दर महिन्याला 5000 रुपये बचत करत असाल, म्हणजे दररोज 167 रुपये आणि SIP द्वारे म्युच्युअल फंडात गुंतवणूक केली, तर निवृत्तीच्या वयाच्या 60 व्या वर्षी तुमच्याकडे 11.33 कोटी इतकी मोठी रक्कम असेल.

मासिक गुंतवणूक रु 5000
अंदाजे परतावा 14%
वार्षिक SIP 10% वाढ
एकूण गुंतवणूक कालावधी 35 वर्षे
एकूण गुंतवणूक रु. 1.62 कोटी
एकूण परतावा रु. 9.70 कोटी
मॅच्युरिटी रक्कम रु. 11.33 कोटी

या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा

दरवर्षी जेव्हा तुमचा पगार वाढतो तेव्हा गुंतवणुकीची रक्कमही वाढवा.
तुम्हाला 35 वर्षांच्या दीर्घ कालावधीत कंपाउंडिंगचे मोठे फायदे मिळतात.
म्युच्युअल फंड तुम्हाला दीर्घ मुदतीसाठी 10-16 टक्के वार्षिक परतावा देतात.

Leave a Comment