सांगली जिल्ह्यात सापडले कोरोनाचे नवे ११ रुग्ण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे

जिल्ह्यात कोरोनाचे विळखा वाढत असताना बुधवारी आणखी अकरा रुग्णांची नव्याने भर पडली. हॉटस्पॉट बनलेल्या शिराळा तालुक्यात पुन्हा चार जण बाधित असल्याचे स्पष्ट झाले. किनरेवाडी येथे 35 वर्षीय पुरुष, 32 वर्षीय महिला, मणदूरमध्ये 70 वर्षीय वृद्धा, तर शिराळ्यात 63 वर्षाचा पुरुष पॉझिटिव्ह आढळला. सांगली शहरात कोरोनाने पुन्हा एंन्ट्री केली असून शंभर फुटी रस्त्यावरील गल्लीत 55 वर्षाची महिला, आटपाडी तालुक्यातील निंबवडेमध्ये 58 वर्षाचा पुरुष व 53 वर्षाची महिला, तासगाव तालुक्यातील शिरगाव येथे 43 वर्षीय पुरुष तसेच जत तालुक्यातील निगडी खुर्दमध्ये 38 वर्षाचा पुरुष, मौजे डिग्रजमध्ये 55 55 वर्षीय पुरुष तर आंधळीत 74 वर्षाचा वृद्ध कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले. जिल्ह्यात आत्तापर्यंत 270 बाधित रुग्ण आढळले असून सद्यस्थितीत 110 जणांवर उपचार सुरु आहेत.

जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या टप्प्याटप्प्याने वाढत आहे. याशिवाय कोरोनामुळे नऊ जणांचा बळी गेले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाचे संकट अधिकच गडद झाल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यात बुधवारी पुन्हा नव्याने नऊ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. शिराळा तालुक्यात मुंबईतून येणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे तालुक्यातील बहुतांशी गावांमध्ये बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे तालुकाच हॉटस्पॉट बनला आहे. त्यात आणखी खार रुग्णांची भर पडली. हॉटस्पॉट मणदूरमध्ये 70 वर्षाची वृद्धा पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले. किनरेवाडी येथे 35 वर्षाच्या पुरुष आणि 32 वर्षाची महिला यांना त्रास होत होता. त्यांची प्राथमिक तपासणी केल्यानंतर कोरोनाची लक्षणे आढळून आली. मिरजेतील रुग्णालयात त्यांना दाखल केल्यानंतर त्यांची कोरोना चाचणी घेतली. या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. शिराळा शहरातही रुग्ण वाढत आहेत. तेथे 63 वर्षाच्या पुरुषामध्ये कोरोनाची लक्षणे होती. त्याची तपासणी केली असता ती व्यक्ती बाधित असल्याचे स्पष्ट झाले.

सांगलीत कोरोनाची पुन्हा एंन्ट्री
सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिका शहर कोरोनामुक्त झाले असताना सांगली शहरात पुन्हा कोरोनाने एंन्ट्री केली. शंभर फुटी रस्त्यांवरील दुसरी गल्लीमध्ये 55 वर्षाची महिला 9 जून रोजी मुंबईतून आली होती. त्या महिलेला 16 जून रोजी त्रास होवू लागला. तिच्यामध्ये कोरोनाची लक्षणे आढळली होती, त्या महिलेची मिरजेतील कोविड रुग्णालयात तपासणी केली असता ती पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले. शहरात कोरोनाचा रुग्ण सापडल्याने महापालिका प्रशासन आणि आरोग्य विभागाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहेत. आरोग्य विभागाकडून परिसरातील नागरिकांचे सर्वेक्षण केले जात आहे.

आटपाडी तालुक्यात दोन रुग्ण
आटपाडी तालुक्यात पुन्हा दोन नव्या कोरोनाच्या रुग्णांची बुधवारी भर पडली. निंबवडेमध्ये 58 वर्षाच्या पुरुष तसेच संपर्कातील 53 वर्षाच्या महिलेमध्ये कोरोनाची लक्षणे आढळली होती. त्या दोघांची तपासणीसाठी स्वॅब घेण्यात आला होता, त्या दोघांचाही अहवाल पॉझिटिव्ह आला. या व्यक्तींच्या संपर्कातील लोकांना क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. तसेच आरोग्य विभागाकडून सर्वेक्षण केले जात आहे.

तासगाव तालुक्यातील शिरगाव येथे 43 वर्षाचा पुरुष आणि जत तालुक्यातील निगडी खुर्दमधील 38 वर्षाच्या पुरुषामध्ये ही कोरोनाची लक्षणे होती. मौजे डिग्रजमध्ये 55 वर्षाचा पुरुष तर पलूस तालुक्याातील आंधळी येथे 74 वर्षाच्या व्यक्तीमध्ये कोरोनाची लक्षणे आढळून आली. त्याची प्राथमिक तपासणी केल्यानंतर त्यांना मिरजेतील रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले. तेथे कोरोना चाचणी केली असता त्या दोन्ही पुरुषांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ संजय साळुंखे यांनी सांगितले.

जिल्ह्यातील सोळा जण कोरोनामुक्त

कोरोनाबाधित रुग्णांपैकी उपचारानंतर सोळा जण कोरोनामुक्त झाले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्यक डॉ. संजय साळुंखे यांनी सांगितले. शिराळा तालुक्यातील हॉटस्पॉट बनलेल्या मणदूर येथील तब्बल दहा जण कोरोनामुक्त झाले. 30, 40, 50 62 वर्षाचा पुरुष असे चार व अकरा वर्षाची अशी दोन मुले, 45 60 72 व 45 वर्षाच्या चार महिला अशा दहा जणांचा समावेश आहे. कोरेगाव येथील 33 वर्षाची महिला, भवरवाडी येथील सोळा वर्षाची मुलगी, वायफळेत 52 वर्षाचा पुरुष, मांगले येथील 53 व 48 वर्षाचा पुरुष तसेच अकरा वर्षाचा मुलगा असे 16 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment