Sunday, March 26, 2023

वाई पोलीस ठाण्यातील १२ पोलीस कोरोना पोझिटीव्ह; सातारा जिल्ह्यात खळबळ

- Advertisement -

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

सातारा जिल्ह्यात कोरोना विषाणुने थैमान घातले आहे. ग्रामिन भागात कोरोना बाधित रुग्ण सापडत असल्याने प्रशासनही चिंतेत आहे. अशात आता वाई पोलीस ठाण्यातील १२ पोलीस कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायल बाब समोर आली आहे. आज या पोलीसांचा कोरोना अहवाल पोझिटीव्ह आल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

वाई येथील एका वाहतुक कर्मचार्‍याला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर वाई पोलीस ठाण्यातील 16 पोलीस कर्मचार्‍यांना क्वारंटाइन करण्यात आले होते. त्या पैकी 12 जणांचे अहवाल आज पाॅझिटीव्ह आले आहेत. वाई पोलीस ठाण्यातील बारा पोलीसांना झाली कोरोनाची लागण झाल्याचे समजताच सातारा पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. सातारा पोलीस दलात एवढ्या मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण होण्याची पहिलीच वेळ आहे.

दरम्यान, सोमवारी रात्री उशीराने सातारा जिल्ह्यात एकुण ९१ नवीन कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत.  एन सी सी एस, ARI, पुणे आणि कृष्णा, कराड यांचेकडून प्राप्त झालेल्या रिपोर्टनुसार 67 जणांचे रिपोर्ट कोरोना बाधित आले. त्यानंतर IISER, पुणे कडून 24 जणांचे अहवाल बाधित आले आहेत. त्यामुळे एकुण 91 जण नवीन कोरोना बाधित सापडले आहेत.

Satara

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.