मुंबई । आज दिवसभरात १२०० कोरोना रुग्णांना दवाखान्यातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. एका दिवसात बरे झालेली हि आजवरची सर्वात मोठी संख्या आहे. अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. तसेच मागील २४ तासात राज्यात कोरोनाचे २ हजार १०० नवीन रुग्ण सापडले असून आता राज्यातील एकूण रुग्णसंख्या ३७ हजार पार गेली आहे अशी माहितीही टोपे यांनी यावेळी दिली.
कोरोनासोबत आपल्याला जगावं लागणार आहे. कोरोनासोबत राहावं लागणार आहे. कारण संपूर्ण जग कोरोनामुळे थांबू शकत नाही. आता आपल्याला आपले व्यवहार सुरु करावे लागतील मात्र योग्य ती खबरदारी हि घ्यावीच लागेल असे आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितले आहे.
दरम्यान, सोशल डिस्टंसिंग आणि शासनाचे नियम पाळूनच आपण कोरोनाला हरवू शकतो असे म्हणत टोपे यांनी नागरिकांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. नॉन रेड झोन परिसरांत बससेवा सुरळीत सुरु करण्यात येणार आहेत. तसेच अशा भागात लॉकडाऊनचे नियम शिथिल करण्यात आले आहेत असाही टोपे यांनी सांगितले.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”