पंढरपुरात ST च्या 125 फेऱ्या रद्द; कार्तिकी एकादशीला येणार्‍या भाविकांना फटका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सोलापूर | एसटी महामंडळाचे राज्य सरकार मध्ये विविध विलिनीकरण करावे या मागणीसाठी राज्यभरातील एसटी कर्मचारी गेल्या पंधरा दिवसांपासून संपावर गेले आहेत. याचा परिणाम एसटीच्या प्रवासी वाहतुकीवर झाला असून पंढरपुरात येणाऱ्या भाविकांना ही मोठा फटका बसला आहे. एसटी कर्मचारी संपामुळे पंढरपूर आगारातून दरोज होणाऱ्या एकशे पंचवीस फेऱ्या बंद आहेत.

दिवसभरात पंढरपूर आगाराला सुमारे दहा लाख रुपयांचा फटका बसत आहे. आगारातील 456 कर्मचारी हे संपावर आहेत. पंढरपुरातून एसटीची प्रवासी वाहतूक बंद असल्याने याचा फटका भाविकांना बसला ही आहे.

तब्बल दोन‌ वर्षानंतर पंढरपूर येथे यंदा कार्तिकी यात्रा भरणार असल्याने वारकरी संप्रदायात आनंदाचे वातावरण आहे. येत्या१५ नोव्हेंबरला पंढरपुरात कार्तिकी यात्रा भरणार आहे. कार्तिकी यात्रेच्याला सुमारे चार लाख‌ भाविक‌ येण्याची शक्यता आहे. मात्र एसटीच्या संपामुळे वारकर्यांना त्याचा फटका बसला आहे.

कोरोनाच्या अनुषंगाने सर्व नियमांचे पालन करत कार्तिकी ( kartiki ekadashi ) यात्रा भरवण्यास जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी परवानगी दिली आहे. राज्यात गेली २ वर्षे कोरोनाचे सावट असल्याने मंदिरे त्याचबरोबर इतर धार्मिक स्थळे पूर्णतः बंद करण्यात आली होती. दरम्यान, इतर धार्मिक कार्यक्रमही रद्द करण्यात आले होते. गर्दी किंवा रस्त्यवर लोक फिरू नये यासाठी कडक लॉकडाऊन देखील करण्यात आला होता. याशिवाय गर्दी टाळण्यासाठी काही कार्यक्रम मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत पार पडण्याचा निर्णय सरकार आणि प्रशासनाच्या वतीने घेण्यात आला होता. मात्र, यावर्षी कोरोनाचे रुग्ण कमी असल्याने यात्रेला परावानागी देण्यात आली आहे.

Leave a Comment