13 वर्षीय मुलीचा विनयभंग, तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल

अमडापूर : हॅलो महाराष्ट्र – अमडापूर या ठिकाणी एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये अमडापूर पाेलिसांनी एका १३ वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी २५ वर्षीय युवकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हि घटना १६ जून राेजी घडली हाेती.

१६ जून राेजी स्वप्निल निंबाजी बोरकर या तरुणाने १३ वर्षीय मुलीकडे वाईट नजरेने पाहून तिचा विनयभंग केल्याची घटना घडली हाेती. याप्रकरणी पीडित तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून अमडापूर पाेलिसांनी आराेपी स्वप्निल बाेरकरविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणात आरोपीविरुद्ध बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण या कायद्यातंर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार नागेश कुमार चतरकर यांच्या मार्गदर्शनाखाली अमडापूर पोलीस करत आहेत.

You might also like