Train Cancelled : रेल्वेकडून आज 139 गाड्या रद्द !!! अशा प्रकारे तपासा रद्द झालेल्या गाड्यांची लिस्ट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Train Cancelled : आपल्या देशात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या फार मोठी आहे.
रेल्वेकडूनही प्रवाशांच्या सोयीसाठी दररोज हजारो गाड्या चालविल्या जातात. मात्र जर कधी रेल्वेकडून या गाड्या रद्द , डायव्हर्ट किंवा री-शेड्यूल केल्या गेल्या तर लोकांची मोठी तारंबळ उडते. जर आपण आज (10 नोव्हेंबर रोजी) ट्रेनने प्रवास करणार असाल तर घर सोडण्यापूर्वी आपल्या ट्रेनचे स्टेट्स तपासा. कारण आजही रेल्वेकडून 139 गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

Indian Railways gets more 'Kavach': How this Made-in-India tech works for trains | Mint

रेल्वेच्या वेबसाइटवरील माहितीनुसार, आज रेल्वेने 151 गाड्या पूर्णपणे रद्द केल्या आहेत. त्याच वेळी, 24 गाड्या या अंशतः रद्द करण्यात आल्या आहेत. इतकेच नाही तर 18 गाडयांना उशिर झाला आहे. या रद्द करण्यात आलेल्या गाड्यांमध्ये पॅसेंजर, एक्सप्रेस आणि मेल गाड्यांचा समावेश आहे. या गाड्या रद्द होण्यामागे किंवा त्यांच्या वेळापत्रकात बदल होण्यामागे अनेक कारणे आहेत. काही वेळा खराब हवामानामुळे गाड्यांचे कामकाज प्रभावित होते. तसेच अनेक वेळा रुळांच्या दुरुस्तीमुळेही गाड्या रद्द कराव्या लागतात. Train Cancelled

Train numbers to be changed as Railway drops special train tag, Railway drop special train tag, train numbers changed

या राज्यांमध्ये जाणाऱ्या प्रवाशांना बसणार फटका

उशीर होणे, मार्ग वळवणे आणि गाड्या रद्द झाकेल्याने महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली, झारखंड, छत्तीसगड, आणि पश्चिम बंगालसहीत काही राज्यांमध्ये जाणाऱ्या आणि येणाऱ्या प्रवाशांवर परिणाम होईल. भारतीय रेल्वे आणि आयआरसीटीसीच्या वेबसाइटवर रद्द, पुनर्निर्धारित आणि वळवलेल्या गाड्यांची माहिती देण्यात आली आहे. Train Cancelled

8 Delhi To Bangalore Trains With Timetable, Fare, & Train Route

रद्द केलेल्या गाड्यांची लिस्ट अशा प्रकारे चेक करा

IRCTC आणि नॅशनल ट्रेन इन्क्वायरी सिस्टीम या दोघांकडून दररोज रद्द झालेल्या गाड्यांची लिस्ट प्रसिद्ध केली जाते. त्यामुळे आता घरबसल्या काही सोप्या स्टेप्स फॉलो करून रद्द केलेल्या गाड्यांची लिस्ट तपासता येईल. यासाठी सर्वांत आधी https://enquiry.indianrail.gov.in/mntes/ या वेबसाइटवर जावे लागेल. यानंतर, Exceptional Trains च्या पर्यायावर क्लिक केल्यावर रद्द केलेल्या तसेच रीशेड्यूल आणि डायवर्ट केलेल्या गाड्यांची लिस्ट मिळेल. Train Cancelled

रेल्वेमधील नोकरी विषयक माहितीकरता इथे भेट द्या : Railway Recruitment 

हे पण वाचा :
‘या’ सरकारी बँकेकडून Home Loan वरील व्याजदरात मिळत आहे सूट
Gold Price Today : दिवाळीनंतरही सोन्या-चांदीच्या दरातील घसरण सुरूच, नवीन दर पहा
Central Bank of India ने FD वरील व्याजदरात केले बदल, नवीन दर पहा
Credit Card चा अशा प्रकारे वापर करून मिळवा अनेक फायदे !!!
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात घसरण, आजचे दर तपासा