औरंगाबादेत मास्क परिधान केलेली १५ फुटी ‘संरक्षक गुढी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्यानिमित्त कुलस्वामिनी प्रतिष्ठानतर्फे सामाजिक संदेश देणारी गुढी उभारून मराठी नवीन वर्षानिमित्त शुभेच्छा दिल्या जातात. या वर्षी कोरोनाचे संकट असल्याने कोरडे दाम्पत्याने राज्यातील कोरोनाचे संकट दूर करण्यासाठी सर्वांनी सतर्क राहावे, असा संदेश देऊन 15 फुटी गुढी उभारली आहे.

महाराष्ट्रावर कोरोनाचे संकट आले आहे. परंतु मराठी नूतन वर्षाचे कोरोनाचे सर्व नियम पाळन्यासाठी “गुढी उभारून समृध्दीची वाट पाहू उद्याच्या सुखाची” “पाळून सर्व कोरोना नियम सुखद करूया जीवन”असा सामाजिक संदेश देणारी गुढी उभारली असून, सर्वांनी काळजी घ्यावी यासाठी औरंगाबाद येथील विलास कोरडे यांनी स्वतः औरंगाबादचे पर्यटन स्थळ लक्षात घेता 3 फूट बाय 15 फुटांच्या कॅनव्हास कपड्यावर चित्र रेखाटली आहेत.

यामध्ये पर्यटन स्थळे, ऐतिहासिक वास्तू आणि जगप्रसिद्ध लेण्यांचे सर्व चित्र रेखाटली आहेत. खास म्हणजे कोरोनाचे नियम पाळत सर्व चित्रे घरीच रेखाटली आहेत. कोरडे दाम्पत्याच्या या अनोख्या उपक्रमाने नवीन वर्षात तरी सगळीकडे सुख समृद्धी नांदो आणि कोरोनाच्या संकटातून सर्वांची मुक्तता होवो; अशी प्रार्थना कुटुंबीयांनी केली आहे.

Leave a Comment