भारतीय नौदलावर कोरोनाचा हल्ला; मुंबईत १५ ते २० नौसैनिक कोरोना पॉझिटिव्ह

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । भारतीय लष्कारानंतर आता कोरोनाने नौदलातही शिरकाव केला आहे. मुंबईतील नौदलाच्या तळावरील १५ ते २० नौसैनिक कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या सर्व नौसनिकांचे कोरोना टेस्टचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. मुंबईतीलच नौदलाच्या रुग्णालयात या नौसैनिकांना क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात आले आहे. एनडीटीव्ही या वृत्तवाहिनीने हे वृत्त दिले आहे.

एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, मुंबईच्या किनाऱ्यावर नौदलाचा आयएनएस आंग्रे हा तळ आहे. या तळावरच नौसैनिकांची निवासस्थाने आहेत. नौदल तळाच्या परिसरातच आवश्यक कामांसाठी हे नौसैनिक फिरले असावेत असा नौदलाचा अंदाज आहे. लॉकडाउनमुळे आयएनएस आंग्रे तळावरील निवासी वसाहती असलेल्या भागांमध्ये नौसैनिक फिरत नाहीत. नौदलाच्या युद्धनौकांवर तैनात असलेले नौसैनिक आणि अधिकाऱ्यांना करोनाची बाधा झाली आहे किंवा नाही हे अजून स्पष्ट झालेले नाही.

भारतीय नौदलात करोना व्हायरसची लागण होण्याचे ही पहिलीच घटना आहे. या नौसैनिकांच्या संपर्कात आलेल्यांना शोधून काढण्यासाठी मोठी शोध मोहिम सुरु झाली आहे. कोरोनाची लागण झालेल्या नौसैनिकांची आयएनएस अश्विनीमध्ये क्वारंटाइनची व्यवस्था करण्यात आली आहे. हे नौदलाचे मुंबईतील रुग्णालय आहे. मुंबईतील नौदलाचे युनिट आणि युद्धनौकांना या तळावरुन वेगवेगळया सुविधा पुरवल्या जातात.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews”

Leave a Comment