आधी अपहरणाचा प्रयत्न, मग भररस्त्यात पाकिस्तानात 18 वर्षीय हिंदू तरुणीची हत्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराची : वृत्तसंस्था – पाकिस्थानमध्ये एका हिंदू मुलीवर रस्त्याच्या मधोमध गोळ्या घालून तिची हत्या करण्यात आली आहे. सर्वात अगोदर तिचे अपहरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र तो अयशस्वी झाल्यानंतर हल्लेखोरांनी तिची भररस्त्यात हत्या केली. हत्या करण्यात आलेल्या मृत तरुणीचे नाव पूजा ओद असे आहे.

काय आहे प्रकरण ?
पूजाचं आधी रस्त्यावर अपहरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. तिने यासाठी विरोध केल्यावर हल्लेखोरांनी तिला रस्त्याच्या मध्यभागी गोळ्या घातल्या असे पीपल्स कमिशन फॉर मायनॉरिटीज राइट्स आणि सेंटर फॉर सोशल जस्टिस यांनी सांगितले आहे. दरवर्षी अल्पसंख्याक समुदायातील, विशेषतः सिंधमधील महिलांचं अपहरण केलं जातं आणि धार्मिक अतिरेकी जबरदस्तीने त्यांचं धर्मांतरण करतात.

पाकिस्तानातील सिंध प्रांतात धर्म परिवर्तन आणि जबरदस्तीने विवाह केल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. अशात आता पुन्हा एकदा असंच प्रकरण समोर आलं आहे, ज्यात एका 18 वर्षीय तरुणीवर सार्वजनिकरित्या गोळ्या झाडून तिची हत्या करण्यात आली आहे. 2019 मध्ये सिंध सरकारने हिंदू अल्पसंख्याकांचं सक्तीचं धर्मांतर आणि विवाह रोखण्यासाठी कायदा बनवण्याचा प्रयत्न केला पण तीव्र विरोध आणि निदर्शनांमुळे हा कायदा लागू होऊ शकला नाही. त्यामुळे अजूनही सिंधमध्ये धर्म बदला किंवा मरा ही वेदनादायक प्रक्रिया सुरूच आहे. 2013 ते 2019 या कालावधीत आतापर्यंत धर्मांतराच्या 156 घटनांची नोंद करण्यात आली आहे.

Leave a Comment