PM Kisan मधील पैशांचे स्टेटस कसे तपासायचे ते जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । देशातील कोट्यवधी शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत येणाऱ्या 11व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. यासाठी ई-केवायसी अपडेट करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

पीएम किसानच्या वेबसाइटनुसार, ज्या शेतकऱ्यांचे ई-केवायसी अपडेट केले गेले आहे आणि त्याचे व्हेरिफिकेशन सरकारने पूर्ण केले आहे. त्यांचे स्टेट्स देखील अपडेट्स केले आहे. ज्या शेतकऱ्यांच्या स्टेट्स मध्ये FTO जनरेटेड असे लिहून येत आहे आणि पेमेंट कन्फर्मेशन बाकी आहे, त्यांचे व्हेरिफिकेशन सरकारने पूर्ण केले आहे आणि सरकारने पेमेंटबाबत कन्फर्मेशनही जारी केले आहे. अशा शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच 11व्या हप्त्याची रक्कम येणार आहे.

अजूनही काही शेतकऱ्यांच्या स्टेट्समध्ये ई-केवायसी दिसत आहे. अशा लोकांना पुढील हप्ता मिळविण्यासाठी पहिले त्यांचे ई-केवायसी अपडेट करावे लागेल. सरकारने एप्रिलपासून ऑनलाइन ई-केवायसी अपडेटची प्रक्रियाही थांबवली आहे. आता यासाठी शेतकऱ्यांना कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये (CSC) जावे लागणार आहे.

‘या’ दिवशी येऊ शकतात पैसे
एप्रिलमध्येच सरकार शेतकऱ्यांना योजनेच्या 11व्या हप्त्यासाठीचे पैसे देऊ शकते, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. नवरात्रीच्या शेवटी, रामनवमीच्या दिवशी किंवा 14 एप्रिलला आंबेडकर जयंतीच्या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होतील, असा अंदाजही वर्तवला जात आहे. गेल्या वर्षी एप्रिल-जुलैचा हप्ता 15 मे रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात आला होता. या दृष्टिकोनातून पाहिल्यास या वेळी सरकार महिनाभर आधीच भेट देऊ शकते.

दरवर्षी 6 हजारांची मदत मिळते
शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत मिळावी यासाठी केंद्र सरकारने 2018 मध्ये ही योजना सुरू केली होती. याअंतर्गत शेतकऱ्यांना दरमहा 500 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते आणि चार महिन्यांचे पैसे एकाच वेळी खात्यावर पाठवले जातात. अशा प्रकारे प्रत्येकी 2,000 रुपयांचे तीन हप्ते दरवर्षी येतात. योजना सुरू झाल्यापासून आतापर्यंत शेतकऱ्यांना 10 हप्ते देण्यात आले असून या महिन्यात 11 तारीख येण्याची शक्यता आहे.

शेतकरी त्यांचे स्टेट्स अशा प्रकारे तपासू शकतात
सर्वप्रथम http://pmkisan.gov.in या वेबसाइटवर जा.
वेबसाइटच्या डाव्या बाजूला फार्मर्स कॉर्नरवर क्लिक करा.
त्यानंतर बेनिफिशियरी स्टेट्सवर क्लिक करा.
येथे आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक टाका आणि समोरच्या खुल्या लिस्टमध्ये तुम्ही तुमचे नाव तपासू शकता.
तुमच्या नावापुढेFTO is Generated and Payment confirmation is pending हे तुम्ही पाहू शकता.
काही विसंगती आढळल्यास, तुम्ही हेल्पलाइन नंबरवर कॉल करूनही तक्रार करू शकता.

Leave a Comment