दोन बसेस समोरासमोर एकमेकांना धडकल्या, भीषण अपघात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

चेन्नई : वृत्तसंस्था – तामिळनाडूमध्ये एक भीषण अपघात (Accident) घडला आहे. हा अपघात ड्रायव्हरच्या केबिनमध्ये असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. त्यामुळे बसच्या ड्रायव्हर केबिनमधून प्रवास करणे किती धोकादायक असू शकते हे समजेल. हि घटना तामिळनाडूमधील सलेम जिल्ह्यात घडली आहे.

काय घडले नेमके ?
सलेम जिल्ह्यात दोन बस एकमेकांसमोर जोरदार धडकल्या. ही धडक इतकी भीषण होती की बस ड्रायव्हर हा थेट सीटवरुन उडाला आणि बाजूच्या काचेवर जाऊन आदळला. बसच्या ड्रायव्हर केबिनमध्ये असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा भीषण अपघात (Accident) कैद झाला आहे. अनेकदा आपण दोन गाड्यांची समोरा समोर झाल्याचं ऐकले असेल मात्र यावेळी तुम्हाला ते पाहायला मिळत आहे.

चुकीच्या लेनमध्ये घुसली बस
चुकीच्या लेनमध्ये आलेल्या बसनं समोरुन येणाऱ्या बसला समोरासमोर जोरात धडक दिली. यावेळी दोन्ही बसचा वेग प्रचंड होता. या भीषण अपघातात (Accident) बसच्या चालकाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. या अपघातात बसमधील काही प्रवासीदेखील गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातामध्ये बस चालकाच्या डोक्यात काचा घुसल्याचे दिसत आहे. यावरून हा अपघात किती गंभीर होता याचा अंदाज लावू शकता.

हे पण वाचा :
अयोध्येत आदित्य ठाकरेंचा हात पकडून जावा, माफी मागावी लागणार नाही; दीपाली सय्यद यांचा राज ठाकरेंना टोला

महाराष्ट्राबाबत केंद्र सरकार सूडबुद्धीने वागतंय; नाना पटोलेंची घणाघाती टीका

…तर महाराष्ट्रातही ओबीसी आरक्षणसहित निवडणूक होतील; आरक्षणाबाबत छगन भुजबळांनी सांगितला ‘हा’ पर्याय

महाविकास आघाडीने ओबीसींच्या राजकीय आरक्षणाची हत्या केली; फडणवीसांची घणाघाती टीका

भाजप आ. जयकुमार गोरेंना हायकोर्टाचा दिलासा, मात्र जामीन नाही

Leave a Comment