चिमुकल्यांना गॅम खेळायला मोबाईल देणं बेतलं जीवावर, बॅटरीचा स्फोट होऊन दोन बालके गंभीर जखमी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद प्रतिनिधी | जिल्यातील वैजापूर तालुक्यातील शिरूर येथे मोबाईल च्या बॅटरीचा स्फोट होऊन दोन बालके गंभीर जखमी झाल्याची घटना आज सकाळी नऊच्या सुमारास उघकीस आली. या दोन्ही बालकांना उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यातील एकाची प्रकृती गंभीर आहे.

कृष्णा रामेश्वर जाधव (वय ८ वर्ष) व कार्तिक रामेश्वर जाधव (वय ५ वर्षे) रा. शिरूर असे गंभीर जखमी झालेल्या बालकांची नावे आहेत. नातेवाईकांनी दिलेल्या माहितीवरून, रामेश्वर व कार्तिक ही दोन भावंडे आज सकाळी नेहमीप्रमाणे झोपेतून उठली. सध्या शाळेला सुट्टी असल्यामुळे वडिलांचा मोबाईल घेऊन त्यामध्ये लूडो गेम खेळत होते. गेम खेळत असताना मोबाईलमधील चार्जिंग कमी झाली. त्यामुळे बालकांनी मोबाईल मधील बॅटरी बाहेर काढून त्या सोबत छेडछाड करत होते. त्याच दरम्यान बॅटरीचा अचानक स्फोट झाला. स्फोट होताच दोन्ही भावंडांच्या हाताची बोटे छिन्नविच्छिन्न झाली. बालकांनी स्फोट झाल्या मुळे आरडाओरड केल्यामुळे नातेवाईकांनी त्यांच्याकडे धाव घेतली. त्यावेळी दोन्ही बालकांच्या हातातून आणि तोंडाला मार लागल्यामुळे रक्तस्त्राव होत होता; नातेवाईकांना काय झाले काय नाही हे काही कळेनासे झाले होते.

बॅटरीचा स्फोट झाल्याचे कळताच नातेवाईकांनी तात्काळ दोन्ही बालकांना घेऊन एका खासगी रुग्णालयात धाव घेतली. तेथील डॉक्टरांनी प्रथम उपचार करून दोन्ही बालकांना पुढील उपचारासाठी येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला. दोन्ही बालकांवर सध्या उपचार सुरू असून एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

Leave a Comment