मुंबई – पुणे द्रुतगती महामार्गावर साताऱ्यातील जागीच 2 ठार : भीषण अपघातात 15 जखमी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

वाई | मुंबई – पुणे द्रुतगती महामार्गावर माडप बोगद्याजवळ झालेल्या भीषण अपघातात सातारा जिल्ह्यातील कोंडावळे (ता. वाई) येथील दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य 15 जण गंभीर जखमी आहेत. अपघातात लक्ष्मी विठ्ठल कोंढाळकर (वय -24) व गणेश बाळू कोंढाळकर (वय -22) रा. कोंढावळे, ता. वाई, जि. सातारा) यांचा जागीच मृत्यू झाला आहे

याबाबत अधिक माहिती अशी की, कोंढावळे येथून कोपरखैरने- नवी मुंबई येथे मारुती इको कारने ड्रायव्हर आणि अन्य 15 जण निघाले होते. मुंबई- पुणे द्रुतगती महामार्गावर मुंबईच्या जवळ सदर कार आली असता (KA- 56 – 2799) हा ट्रक रस्त्याच्या कडेला पंक्चर झालेला टायर बदलण्यासाठी उभा होता. त्याला इको कारने भरधाव वेगाने पाठीमागून धडक दिली. धडक एवढी गंभीर होती की इको कारमधील सर्वच प्रवाशांना इजा झाली. यात दोघांचा जागीत मृत्यू झाला तर इतर जखमी प्रवाशांना कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे. त्यातील सहा ते सात जणांना गंभीर स्वरूपाच्या जखमा झालेल्या आहेत त्यांची प्रकृती नाजूक आहे.

मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या भीषण अपघातामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक खोळंबली होती. इको कार मधील जखमींना बाहेर काढण्यासाठी आयआरबी पेट्रोलिंग आणि देवदूत यंत्रणेला मोठी कसरत करावी लागली. अपघात झाल्याची माहिती मिळताच सुरक्षा यंत्रणेंसोबत डेल्टा फोर्स, लोकमान्य हॉस्पिटलच्या ॲम्बुलन्स, पळस्पे वाहतूक शाखेचे वाहतूक पोलीस, खालापूर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी टीमचे सदस्य घटनास्थळी दाखल झाले होते.