फक्त 12 रुपयांच्या प्रीमियमवर 2 लाखांचा इन्शुरन्स; तुम्हीही घेतला आहे का हा विमा ?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । अपघात, आजार किंवा कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत इन्शुरन्स हा आपला सर्वात मोठा आधार आहे. कोरोना महामारीमुळे आपल्याला इन्शुरन्सचे महत्त्व चांगलेच समजले आहे. इन्शुरन्सच्या माध्यमातून आपल्याला कमी खर्चात मोठी आर्थिक मदत मिळू शकते. मोठ्या आर्थिक मदतीसाठी आपल्याला जास्त पैसे खर्च करावे लागतील असे नाही, मात्र आपण नाममात्र प्रीमियमवर लाखो रुपयांचा इन्शुरन्स बेनिफिट घेऊ शकतो.

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना ही अशीच एक इन्शुरन्स योजना आहे. या इन्शुरन्स योजनेअंतर्गत, 2 लाख रुपयांचा ऍक्सिडेंटल इन्शुरन्स कव्हर फक्त 12 रुपये खर्चून उपलब्ध आहे. म्हणजेच दरमहा केवळ एक रुपयाचा खर्च.

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत, विमाधारकाचा मृत्यू झाल्यास, त्याच्या नॉमिनीला 2 लाख रुपये मिळतात. जर या अपघातात विमाधारकाचे दोन्ही डोळे पूर्णपणे निकामी झाले किंवा दोन्ही हात किंवा दोन्ही पाय निरुपयोगी झाले किंवा एका डोळ्याची दृष्टी गेली किंवा एक हात किंवा पाय काम करत नसेल तर विमाधारकास 2 लाख रुपये मिळतील. व्यक्ती अंशतः अपंग असल्यास 1 लाखांपर्यंतचे कव्हरेज उपलब्ध आहे.

इन्शुरन्स कव्हर कसे मिळवायचे ?
2015 मध्ये पंतप्रधान सुरक्षा विमा योजना सुरू करण्यात आली. 18 ते 70 वर्षे वयोगटातील कोणतीही व्यक्ती या योजनेसाठी अर्ज करू शकते. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना ही एक टर्म प्लॅन आहे आणि जो एक वर्षासाठी व्हॅलिड आहे. त्यानंतर दरवर्षी त्याचे रिन्यूअल करावे लागते.

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेसाठी अर्ज बँक खात्याद्वारे करता येतो. यामध्ये इन्शुरन्स घेणाऱ्या व्यक्तीचे आधार कार्ड बँक खात्याशी जोडलेले असावे. तुमचे खाते असलेल्या बँकेत तुम्हाला PMSBY चा फॉर्म भरावा लागेल. फॉर्म भरल्यानंतर तुमच्या बँक खात्यातून दरवर्षी 12 रुपये कापले जातात. या योजनेत 1 जून ते 31 मे या कालावधीत एक वर्षाचे कव्हर दिले जाते. पॉलिसीधारकाच्या बँक खात्यात 31 मे पर्यंत पुरेशी रक्कम असणे आवश्यक आहे जेणेकरून 12 रुपयांचा प्रीमियम बँक खात्यातून कापला जाईल. अपघात झाल्यास, क्लेम 30 दिवसांच्या आत करावा लागतो आणि क्लेम जास्तीत जास्त 60 दिवसांच्या आत निकाली काढला जातो.

याचा लाभ करोडो लोकं घेत आहेत
देशातील करोडो लोकं प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा लाभ घेत आहेत. या योजनेतील लाभार्थ्यांची संख्याही 27.26 कोटींच्या पुढे गेली आहे. डिपार्टमेंट फायनान्शिअल सर्व्हिसेस (DFS) ने म्हटले आहे की, हा एक असा सोशल सिक्युरिटी प्लॅन आहे ज्यामध्ये पॉलिसीधारकाला 12 रुपये वार्षिक प्रीमियम भरावा लागतो आणि त्या बदल्यात त्यांना 2 लाख रुपयांचे इन्शुरन्स कव्हर मिळते

Leave a Comment