Tuesday, February 7, 2023

कराड- तासगाव मार्गावर दोन अपघातात 2 जण ठार

- Advertisement -

कराड | वडगाव हवेलीजवळ कराड ते तासगाव या राष्ट्रीय मार्गावर रात्री झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातामध्ये दोन जण ठार झाले तर एकजण गंभीर जखमी झाला. दिलीप भिमराव जगताप (वय- 58, रा. वडगाव हवेली, ता. कराड) व आकाश लोंढे (वय 35, रा. कार्वे नाका, गोळेश्वर) अशी ठार झालेल्यांची नावे आहेत. तर सुनील गोतपागर हे जखमी आहेत.

घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी की, काल रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास पहिला अपघात घडला. दिलीप जगताप हे त्यांचे सहकारी सुनिल गोतपागर यांच्याबरोबर आपल्या दुचाकीवरून शेणोली स्टेशनकडून वडगाव हवेलीस घरी येत असताना वडगावच्या फाट्याजवळ कराडच्या दिशेने वेगाने आलेल्या चारचाकी गाडी (गाडी क्रमांक मिळालेला नाही)ने त्यांच्या दुचाकीस जोराची धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, अपघात घडताच चारचाकी कारच्या एअर बलून उघडले. व जगताप यांचा एक पाय पूर्णतः तुटला. त्यांना व जखमी गोतपागर यांना कराड येथे उपचारासाठी नेत असताना जगताप यांचा वाटेतच मृत्यू झाला. जगताप यांच्या मागे पत्नी व मुले असा परिवार आहे.

- Advertisement -

या अपघातामधील चारचाकी वाहन रस्ता ओलांडून बाहेर गेलेल्या ठिकाणावरून बाहेर काढण्यासाठी क्रेन आणण्यात आली. सुमारे तासभर अंतराच्या आत कराडकडून शेणोलीकडे चाललेल्या दुचाकीस्वारास अंधारात क्रेन न दिसल्याने तो त्या क्रेन वर जोरात आदळल्याने आकाश लोंढे जागीच ठार झाला. तासाभराच्या अंतराने झालेल्या दोन विचित्र अपघाताच्या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.