दुर्दैवी! नातीला फुगा घ्यायला गेले अन् झाला सिलेंडरचा स्फोट, 2 वर्षांच्या चिमुकलीचा जागीच मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अमरावती : हॅलो महाराष्ट्र – अमरावती जिल्ह्यात एक मन हेलावून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. या ठिकाणी यात्रेमध्ये फुगे विकण्यासाठी आलेल्या एका विक्रेत्याकडे असलेल्या गॅस सिलेंडरचा अचानक स्फोट (gas cylinder explodes) झाल्याने एका 2 वर्षांच्या चिमुरडीचा जागीच मृत्यू झाला आहे. या दुर्दैवी घटनेमुळे (gas cylinder explodes) सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे.

काय घडले नेमके?
अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यातील शिंदी बुद्रुक येथील ताना पोळ्याच्या निमित्ताने यात्रा भरवण्यात आली होती. दरवर्षी ही यात्रा भरवली जाते. या यात्रेनिमित्त गावातील लोकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी यात्रेत लहान मुलांसाठी खेळणीची दुकानं सजली होती. या यात्रेमध्ये हवेत उडणारे अर्थात गॅसचे फुगे विकण्यासाठी विक्रेत्यांनी (gas cylinder explodes) गर्दी केली होती. मात्र गॅसचे फुगे विकणाऱ्याकडे असलेल्या गॅस सिलेंडरचा (gas cylinder explodes) अचानक स्फोट झाल्यामुळे दोन वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

परी सागर रोही असे मृत चिमुकलीचे नाव असून ती आपल्या आजोबासोबत गावाकडील तान्हा पोळ्याच्या यात्रेत फिरण्यासाठी गेले होते. उडणारा फुगा बघून ती आपल्या आजोबासोबत फुगे विक्रेत्याजवळ गेली होती. आजोबानेही लाडाने आपल्या नातीला फुगा घेऊन देण्यासाठी घेऊन गेले होते पण अचानक फुगे विक्रेता जवळील गॅस सिलेंडरचा स्फोट (gas cylinder explodes) झाला आणि यामध्ये परीचा एक पाय शरीरापासून वेगळा झाला. यानंतर तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तिच्यावर उपचार सुरु असताना तिचा मृत्यू झाला.

हे पण वाचा :
निवडणूकीचा बिगूल वाजला ः राज्यात 92 नगरपालिकांचा कार्यक्रम जाहीर

आता IDFC First Bank देणार महागड्या दरात कर्ज, आजपासून MCLR चे नवीन दर लागू!!!

IND vs ENG 1st 20: Rohit Sharma ने रचला वर्ल्ड रेकॉर्ड, अशी कामगिरी करणारा ठरला पहिलाच कर्णधार

‘या’ सरकारी योजनेमध्ये फक्त 1,000 रुपयांच्या गुंतवणूकीद्वारे मिळवा दुप्पट पैसे !!!

येत्या निवडणुकीत भाजपसोबत युती करणार का?; राजू शेट्टींनी दिलं ‘हे’ उत्तर