वाई | वाई तालुक्यातील खानापूर येथून ट्रान्सफाॅर्मर फोडून जवळपास 30 हजार रूपयांची ताब्यांच्या तारेची चोरी झाली होती. या बाबत पोलिसांत तक्रार दिलेली होती. त्यानुसार ट्रान्स्फॉर्मरमधील तांब्याच्या तारांच्या चोरीचा गुन्हा वाईच्या गुन्हे प्रकटीकरण विभागाच्या पथकाने उघडकीस आणला. भंगार खरेदी- विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या दोन संशयित तरुणांना पोलिसांनी अटक केली. अधिक तपास केला असता त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, चांदबाबू अब्दुलगफार रायनी (वय- 19, मूळ रा.बालापूर, जि. बलरामपूर राज्य मध्यप्रदेश, सध्या भुईंज, ता. वाई) व इम्रान हासिम पठाण (वय- 19, रा. पाचवड, ता. वाई) अशी संशयितांची नावे आहेत. खानापूर, ता. वाईच्या गावच्या हद्दीत चोरट्यांनी ट्रान्स्फॉर्मर फोडून 30 हजार रुपये किमतीची तांब्याची तार लंपास केली होती. याप्रकरणी वायरमन दिलीप शिवराम मोरे यांनी तक्रार दिली होती. पाचवड व भुईंज परिसरात या चोरीतील तांब्याच्या तारा असल्याची माहिती मिळाली.
त्यानुसार चांदबाबू रायनी व इम्रान पठाण या दोघांना पाचवड येथून ताब्यात घेतले. त्यांनी चोरीची कबूली देत चोरीचे तांबे हे पाचवडमधीलच एका भंगार गोडावूनमध्ये लपवल्याचे सांगितले. त्यानुसार 23 हजार रुपये किमतीची तांब्याची तार जप्त केली आहे. सहायक फौजदार विजय शिर्के, हवालदार किरण निंबाळकर, श्रावण राठोड, पोना सोनाली माने यांनी कारवाई केली.