औरंगाबाद | नॅशनल सफाई कर्मचारी फायनान्स आणि डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या अंतर्गत वाल्मिकी समाजातील 200 महिलांना वेगवेगळ्या कोर्सचे प्रशिक्षण गोकुळ डुलगज यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आले. आज आ. अंबादास दानवे व आ. प्रदीप जैस्वाल यांच्या हस्ते प्रशिक्षित महिलांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.
वाल्मिकी हा समाज आर्थिक दृष्ट्या मागासलेला असून या समाजातील महिला अत्यल्प प्रमाणात शिक्षित आहेत. महिलांनी स्वतःच्या पायावर उभे राहावे व आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्यासाठी या महिलांना सेल्फ एम्पलोयेड टेलर (शिवण काम), स्वींग मशीन ऑपरेटर, डोमेस्टिक डाटा एन्ट्री ऑपरेटर, ब्युटी थेरपिस्ट ट्रेड (ब्युटी पार्लर) या कोर्सचे प्रशिक्षण देण्यात आले. चार महिन्याच्या कालावधीत महिलांना तसेच तरुणींना रोजगार मिळावा म्हणून प्रशिक्षण देण्यात आले.
या प्रशिक्षण सत्राचा आज शेवटचा दिवस होता. प्रशिक्षित महिलांना आज प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. या क्रार्यकमात आमदार अंबादास दानवे, आमदार प्रदीप जैस्वाल यांनी बोलताना प्रशिक्षित महिलांना अकरा शिलाई मशीन व महानगरपालिका अंतर्गत हॉल उपलब्ध करून देण्याची अभिवचन दिले. या कार्यक्रमास वैशाली पाटील, कोग्रेस नेते इकबालसिंग गिल, एम्पिकॉनच्या अनुराधा तोमर तसेच वाल्मिकी समाजातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.