बीड हादरलं ! शेतात काम करणाऱ्या 22 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार

बीड : हॅलो महाराष्ट्र – बीडमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये शेतात काम करणाऱ्या एका विहवाहित महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे. बीड जिल्ह्यातील परळी ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली आहे. घराजवळ असलेल्या शेतात सामूहिक बलात्कार झाल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

काय आहे नेमके प्रकरण ?
पीडित 22 वर्षीय महिला ही शेतालगत असलेल्या घरात आपल्या कुटुंबासोबत राहते. घटनेच्या दिवशी पीडिता आपल्या शेतातील घरालगत शेतात काम करत होती. यादरम्यान अंगद केशव भदाडे आणि साजन तिडके या आरोपींनी पीडिता एकटी असल्याचा फायदा घेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.

सामूहिक बलात्कार करुन धमकावले
या आरोपींनी पीडित महिलेवर सामूहिक बलात्कार केल्यावर पिडीतेला याबाबत कोणाला सांगितले तर तुला आणि तुझ्या कुटुंबाला जीवे मारू अशी धमकीसुद्धा दिली. याप्रकरणी 22 वर्षीय पीडितेच्या फिर्यादीवरून परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात 376 (ड), 323, 506 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

3 तासांत आरोपी गजाआड
सामूहिक बलात्कार झाल्याची तक्रार पोलिसांत दाखल होताच पोलिसांनी तातडीने आपली पोलीस यंत्रणा कामाला लावून आरोपींचा शोध सुरू केला. यानंतर पोलिसांनी अवघ्या 3 तासांत आरोपींना अटक केली आहे. परळी ग्रामीण पोलिसांकडून हि कारवाई करण्यात आली आहे.