नाशिकमध्ये 22 वर्षीय तरुणाची दगडाने ठेचून निर्घृणपणे हत्या

नाशिक : हॅलो महाराष्ट्र – नाशिकमध्ये सध्या हत्येचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील तळेगाव दिंडोरी येथील दिपक जनार्दन जाधव या 22 वर्षीय तरुणाची रात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने दगडाने ठेचून निर्घुणपणे हत्या केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

नाशिक-कळवण राज्य महार्गालगत सार्वजनिक वाचनालयाजवळील बाभळीच्या झाडाजवळ झुडपांमध्ये हा मृतदेह टाकून आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला असावा असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. या घटनेचा पुढील तपास दिंडोरी पोलीस ठाण्याचे पोलिस निरिक्षक प्रमोद वाघ आणि पोलिस कर्मचारी करत आहेत.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यानंतर पोलिसांनी घटनास्थळावर पंचनामा करुन दिपकचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला. आरोपींनी दिपकची दगडाने ठेचून अतिशय निर्घृणपणे हत्या केली होती. हि हत्या नेमकी कोणी केली तसेच या हत्येमागे नेमकं काय कारण आहे याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.