काँग्रेसमध्ये तांडव !! लेटरबॉम्ब टाकणारे ‘ते’ 23 नेते आज जम्मू मध्ये येणार एकत्र

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काही महिन्यांपूर्वी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्त्वाविषयी उघडपणे नाराजी व्यक्त करणाऱ्या काँग्रेसच्या 23 ज्येष्ठ नेत्यांच्या (Congress G-23 leaders) सध्याच्या हालचालींमुळे राजकीय वर्तुळाचे कान टवकारले आहेत. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना पत्र लिहिणाऱ्या २३ नेत्यांची जम्मूत आज बैठक होत आहे. हे नेते पक्ष नेतृत्वाला आणि गांधी घराणाऱ्याला कठोर संदेश ( rahul gandhi ) देऊ शकतात.

जम्मूमध्ये शनिवारी काँग्रेसच्या जी २३ गटाची बैठक होत आहे. पक्षाचे वरिष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांच्या घरी ही बैठक होण्याची शक्यता आहे. कपिल सिब्बल, आनंद शर्मा, राज बब्बर हे रात्रीच दाखल झाले आहेत. इतर काही नेते सकाळी येण्याची शक्यता आहे. पक्षातल्या लोकशाही व्यवस्थेवर हे नेते चर्चा करतील, अशी शक्यता आहे.

काही दिवसांपूर्वीच राज्यसभेत निरोप समारंभ पार पडलेले माजी खासदार गुलाम नबी आझाद यांनी या 23 नेत्यांना जम्मूत येण्याचे निमंत्रण दिले आहे. याठिकाणी “सेव द आइडिया ऑफ इंडिया” ही मोहीम लाँच करण्यात येणार आहे. हा काँग्रेस पक्षाचा अधिकृत कार्यक्रम नाही. एकीकडे राहुल गांधी दक्षिणेच्या दौऱ्यावर असताना बंडखोर नेत्यांची ही एकजूट काँग्रेस पक्षासाठी चांगले लक्षण नसल्याची चर्चा आहे. त्यामुळे हे नेते आता जम्मूत काँग्रेसच्या नेतृत्त्वाविरुद्ध उघडपणे आवाज उठवणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment