व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

स्वच्छता निरीक्षकांसाठी ‘या’ महापालिकेने घेतल्या तब्ब्ल 24 ई-बाईक

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

माझी वसुंधरा आणि रेस टू झिरो अंतर्गत महापालिकेने 24 ई-बाईक घेतल्या आहेत. दैनंदिन कामकाजासाठी स्वच्छता निरीक्षक यांना आपल्या प्रभागात फिरतीसाठी आणि अन्य कार्यालयीन कामकाजासाठी वापरता येणार आहेत. ई-बाईक घेणारी राज्यातील पहिलीच महापालिका सांगलीची ठरली आहे.

महापौर दिग्विजय सुर्यवंशी, आयुक्त नितीन कापडणीस, स्थायी सभापती निरंजन आवटी, विरोधी पक्षेनेते संजय मेंढे, उपायुक्त राहुल रोकडे, आरोग्यधिकारी डॉ.रवींद्र ताटे यांच्या उपस्थितीत स्वच्छता निरीक्षकांना या बाईक प्रदान करण्यात आल्या. आपल्या दैनंदिन कामकाजासाठी स्वच्छता निरीक्षक यांना आपल्या प्रभागात फिरतीसाठी आणि अन्य कार्यालयीन कामकाजासाठी वापरता येणार आहेत.

या ई-बाईकमुळे महापालिकेने यापूर्वीच प्रदूषणमुक्तीसाठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले आहेत. त्यात या ई-बाईकमुळे प्रदूषणमुक्त सांगली करण्यासाठी आणखीन ऊर्जा मिळणार आहे. आशा प्रकारे स्वच्छता निरीक्षकांना ई बाईक देणारी ही महाराष्ट्रातील पहिलीच महापालिका आहे. ई बाईक प्रदान केल्यानंतर सर्व स्वच्छता निरीक्षकानी या ई बाईकवरून शहरात फेरी काढत इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करा, पर्यावरणाचे रक्षण करा असे आवाहन केेले.