धक्कादायक ! घरात घुसून तरुणीवर अत्याचार पुण्यामधील घटना

पुणे : हॅलो महाराष्ट्र – पुणेमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका तरुणाने मुलीचे आई-वडील बाहेर गेल्याची संधी साधून घरात घुसून अत्याचार केले आहेत. तसेच त्याने या घटनेचे व्हिडिओ शूटिंग करून ते वायरल करण्याची धमकी देऊन अनेकदा तिच्यावर अत्याचार केले. हि घटना पाषाण परिसरात घडली आहे. या प्रकरणी चतुःश्रुंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अण्णा उर्फ सुहास शिंदे या तरुणावर बलात्कार व ‘पॉक्सो’अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात १९ वर्षांच्या तरुणीने तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी रस्त्याने एकटी जात असताना सुहास शिंदे याने तिला धमकावून बावधन येथील टेकडीवर नेले. त्या ठिकाणी त्याने तिच्याशी अश्लील भाषेत बोलून तिचा विनयभंग केला.

यानंतर त्याने मार्च २०१९ मध्ये पीडित मुलीचे आई-वडील बाहेर गेल्याची संधी साधून आरोपी तिच्या घरात घुसला. त्यानंतर त्याने जबरदस्तीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. तसेच त्याने या घटनेचा व्हिडिओसुद्धा शूट केला. त्यानंतर त्याने हा व्हिडिओ तुझ्या आईला दाखवेन अशी धमकी दिली. तसेच पीडित मुलीच्या मित्रालाही, ‘तू आमच्यात पडू नको,’ अशी धमकीसुद्धा दिली. त्यानंतर त्याने व्हिडिओचा स्क्रीनशॉट इन्स्टाग्रामवर पाठवून तो त्या तरुणीला वारंवार त्रास देत होता.

You might also like