धक्कादायक ! वडिलांसोबत उपचारासाठी आलेल्या तरुणीसोबत डॉक्टरचं विकृत कृत्य

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

गोंदिया : हॅलो महाराष्ट्र – काही दिवसांपूर्वी मुंबई येथील नालासोपारा परिसरातील खाजगी रुग्णालयात एका वरिष्ठ डॉक्टरनं आपल्यासोबत काम करणाऱ्या नर्सचा विनयभंग केला होता. हि घटना ताजी असताना आता गोंदियामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये उपचार घेण्यासाठी आलेल्या एका 24 वर्षीय तरुणीचा विनयभंग करण्यात आला आहे. या प्रकरणी पीडित तरुणीनं डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

हि घटना गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तालुक्यातील कट्टीपार या ठिकाणची आहे. हि 24 वर्षीय पीडित तरुणी आपल्या वडिलांसोबत कट्टीपार येथील एका रुग्णालयात उपचारासाठी आली होती. या दरम्यान आरोपी डॉक्टरनं उपचार करण्याच्या बहाण्यानं पीडित तरुणीला अश्लील स्पर्श केले आहेत.

या संतापजनक घटनेनंतर पीडित तरुणीनं आमगाव पोलीस ठाण्यात जाऊन संबंधित डॉक्टर विरोधात फिर्याद दाखल केली आहे. यानंतर पोलिसांनी विनयभंगासह अन्य कमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपी डॉक्टरचं नाव डॉ. हरीणखेडे असे आहे. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

Leave a Comment