रंगत वाढली : म्हासुर्णे विकास सेवा सोसायटीसाठी 12 जागांसाठी 25 जण रिंगणात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुसेसावळी | खटाव तालुक्यातील येथील म्हासुर्णे विकास सेवा सोसायटीची पंचवार्षिक निवडणुक सन 2022 ते 2027 च्या निवडणूकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आलेमुळे चांगलीच रंगत दिसुन येत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. सदर सोसायटीची निवडणूक गेली 15 वर्षे झाली बिनविरोधच होत होती. पण यावर्षीची सोसायटीची निवडणूक लागल्यामुळे गावातील नेतृत्व पणाला लागल्याने सर्वांचे लक्ष या निवडणुकीच्या निकालाकडे लागले आहे.

तरी येथील श्री सिध्दनाथ शेतकरी विकास सहकार पॅनेलची निवडणूक चेअरमन राजाराम माने, गोरख माने, माजी सरपंच राजाराम माने, सरपंच सचिन माने, व्हा. चेअरमन विलास शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढवली जात आहे. तर श्री भैरवनाथ शेतकरी सहकार पॅनेलची निवडणुक श्रीराम विदयालयाचे चेअरमन महादेव माने,किसन माने,माजी चेअरमन दादासाहेब कदम, नामदेव माने ग्रामपंचायत सदस्य तुषार माने यांच्या नेतृत्वाखाली लढवली जात आहे.

श्री सिध्दनाथ शेतकरी विकास सहकार पॅनेलचे अधिकृत उमेदवार सर्वसाधारण पुरुष मतदार संघातुन शहाजी विठ्ठल खाडे, गोरखनाथ सिताराम दबडे, राजाराम नाना दबडे, अधिक शिवाजी माने, बापुराव शामराव माने, सुरेश सर्जेराव माने, दादाहय्याद गफार सय्यद, आनंदा परसु सरनोबत, महिला राखीव मतदारसंघातुन अर्चना आप्पासो निकम, सुनिता संतोष सुर्यवंशी, विमुक्त जाती/ भटक्या जमाती मतदारसंघातुन वसंत आप्पा यमगर ,अनु.जाती/जमाती राखीव मतदारसंघातुन रमेश अंतु घोलप,असे निवडणुकी च्या रिंगणात उमेदवार आहेत. तर इतर मागास प्रवर्गातून बिनविरोध रविंद्र सिदु सरकाळे यांची निवड झाली आहे.

तसेच श्री.भैरवनाथ शेतकरी सहकार पॅनेलचे अधिकृत उमेदवार सर्वसाधारण पुरुष मतदार संघातुन दादासो ज्ञानु कदम, रामचंद्र महादेव दबडे ,अधिक सदाशिव माने, चंद्रकांत काशिनाथ माने, प्रदिप प्रताप माने ,संजय श्रीरंग मोरे,दुर्योधन गोविंद शिंदे ,सुरेश तुकाराम शिंदे, विमुक्त जाती/ भटक्या जमाती मतदारसंघातुन दिपक आत्माराम यमगर, महिला राखीव मतदारसंघातुन कांताबाई प्रभाकर माने,अनुसुचित जाती / जमाती राखीव मतदारसंघातुन जगन गणपत वायदंडे असे निवडणुकीच्या रिंगणात उमेदवार आहेत. तर अपक्ष सर्वसाधारण पुरुष मतदारसंघातुन उमेदवार जालिंदर शंकर माने ,दादासो राजाराम माने हे आहेत.

निवडणूक रिंगणात एकुण 25 उमेदवार उभे राहून आपले नशीब आजमवत आहेत. २९ एप्रिल ला मतदान होत आहे. तरी या सोसायटी निवडणुकीकडे खटाव तालुक्यासह कराड-उत्तर मतदार संघाचे लक्ष लागुन राहिले आहे.

Leave a Comment