धक्कादायक! 27 वर्षीय मॉडेलवर सामूहिक बलात्कार; 2 दिवस सुरु होत्या नरकयातना

कोची : वृत्तसंस्था – आजकाल देशात महिला आणि अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचारात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यामध्ये आता एका 27 वर्षीय मॉडेलवर सामूहिक अत्याचार केल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. या नराधम आरोपींनी गुंगीचं औषध देऊन पीडित मॉडेलवर दोन दिवस अत्याचार केले आहेत. यानंतर पीडित तरुणीने कशीबशी आरोपीच्या तावडीतून आपली सुटका करून घेतली आणि पोलीस ठाण्यात जाऊन आरोपींविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे. यानंतर पोलिसांनी बलात्कार पीडित मॉडेलच्या तक्रारीवरून 3 संशयित आरोपींविरोधात बलात्कारासह अन्य कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला.

हे तिन्ही नराधम आरोपी हे पीडित मॉडेलच्या ओळखीचे असून पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून बाकी दोन आरोपी अजून फरार आहेत. हि घटना केरळ राज्यातील कोची याठिकाणी घडली आहे. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत. पीडित मॉडेल ही केरळच्या मलप्पुरम येथील रहिवासी आहे. तर संबंधित सर्व आरोपी हे पीडित तरुणीच्या ओळखीचे आहेत. आरोपींच्या बोलावण्यावरून हि पीडित तरुणी कोची याठिकाणी गेली होती.

यानंतर आरोपींनी पीडितेच्या नकळत तिच्या ड्रिंकमध्ये गुंगी मिसळले आणि तिला प्यायला दिले. यानंतर नराधम आरोपींनी आळीपाळीने पीडितेवर सामूहिक अत्याचार केला आणि त्याचा अश्लील व्हिडीओ देखील शूट केला. यानंतर आरोपींनी संबंधित व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत पीडितेवर लगातार दोन दिवस अत्याचार केले. या नराधमांच्या तावडीतून सुटल्यानंतर पीडित मॉडेलनं पोलीस ठाण्यात जाऊन तिन्ही आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी धडक कारवाई करत मुख्य आरोपी सालिन याला अटक केली आहे. तर शमीर आणि अजमल अद्याप फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

You might also like