देशात 2,73,810 नव्या कोरोनाबाधितांची नोंद,लसीकरणाने ओलांडला १२ कोटींचा टप्पा

 

नवी दिल्ली वृत्तसंस्था : देशात करोनाची रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. अशा परिस्थितीमध्ये देशातील प्रत्येक राज्य आपापल्या परीनं कोरोनावर मात करण्यासाठी झगडत आहे. देशात मागील 24 तासात दोन लाख 73 हजार 810 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. तर मागील 24 तासात 1,619 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

नव्याने आढळलेल्या कोरोना बाधित रुग्णांमुळे आतापर्यंत एकूण करोना बाधित रुग्णांची संख्या 1 कोटी 50 लाख 61 हजार 919 इतकी झाली आहे. देशात सध्या 19 लाख 29 हजार 329 रुग्णांवर कोरोनावरील उपचार सुरू आहेत. तर आतापर्यंत कोरोनामुळे 1लाख 78 हजार 769 रुग्ण दगावले आहेत.

तर देशात आतापर्यंत एक कोटी 29 लाख 53 हजार 821 जण कोरोनातून पूर्णपणे बरे झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. देशात लसीकरण मोहीम ही सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत देशात 12 कोटी 38 लाख 52 हजार 566 जणांना कोरोना वरील लस देण्यात आली आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी अनेक राज्यांनी लॉकडाऊनचा पर्याय निवडला आहे. कोरोनाबाधितांची सर्वाधिक संख्या ही महाराष्ट्रात आढळून येत आहे.

You might also like