Tuesday, June 6, 2023

मुंबईतील नायर हॉस्पिटलमधील २६ वर्षीय डॉक्टरची आत्महत्या; स्वतःला इंजेक्शन टोचून संपवले जीवन

मुंबई । मुंबईतील नायर रुग्णालयातील एका २८ वर्षीय डॉक्टरने स्वतःला इंजेक्शन टोचून घेत आत्महत्या केली. काल मध्यरात्री ही धक्कादायक घटना घडली. त्याच्या आत्महत्येमागील कारण कळू शकलेले नाही. रुग्णालय प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, डॉक्टरचा मृतदेह त्याच्या खोलीत आढळून आला असून, विच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, डॉ. तुपे (वय २८) असे मृत डॉक्टरचे नाव आहे. तुपे मूळचे औरंगाबादचे राहणारे होते. डॉ. तुपे काही दिवस रजेवर होते. त्यानंतर ते पुन्हा रुजू झाले होते. दरम्यान, काल मध्यरात्री खोलीत त्याचा मृतदेह आढळून आला. तुपे यांनी खोलीत स्वतःला इंजेक्शन टोचून घेत आत्महत्या केली. उपचारासाठी नायर रुग्णालयात नेले असता, तेथील डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले, अशी माहिती पोलिसांनी दिली.

डॉ. तुपे यांच्या आत्महत्येमागील कारण अजून कळू शकलेले नाही. आग्रीपाडा पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे. नायर रुग्णालयात यापूर्वी २०१९ मध्ये डॉ. पायल तडवी हिनेही आत्महत्या केली होती.

बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’.