व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

अमरावतीमधील मेळघाटात भीषण अपघात; 3 जणांचा जागीच मृत्यू

अमरावती : हॅलो महाराष्ट्र – अमरावतीच्या मेळघाटातील राणीगाव घाटात भीषण अपघात (accident) झाला आहे. या अपघातात (accident) 3 जणांचा मृत्यू झाला 1 जण गंभीर जखमी झाला आहे. तसेच बाकी लोक किरकोळ जखमी झाले आहेत. आठवडी बाजारातून परत जात असताना हा भीषण अपघात (accident) झाला. यामध्ये राणीगाव मार्गे आकोटला पिकअप वाहन चाललं होतं. यावेळी घाटातून जात असताना वळणावर अचानक चालकाचे नियंत्रण सुटले आणि गाडी घाटात पलटी होऊन हा अपघात (accident) झाला.

या अपघातात (accident) जखमी झालेल्या व्यक्तींना उपचारांसाठी तातडीने धारणी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघातानंतर रुग्णालयाच्या परिसरात लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. आठ दिवसांपूर्वीच मेळघाटमध्ये टेंबुरसोंडा गावाजवळ मजुरांना घेऊन जाणाऱ्या एका क्रुझरला अपघात (accident) झाला होता. त्या अपघातात 13 जण जखमी झाले होते तर एकाचा जागीच मृत्यू झाला होता.

घाटातील रस्त्यांची दुरावस्था असल्यामुळे याठिकाणी अपघाताच्या (accident) घटना वारंवार घडत आहेत. यासोबतच प्रवास करण्यासाठी वाहनांची सोयही नसल्याने उपलब्ध वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसतात. रस्त्याची दुरावस्था आणि अतिप्रवासी यामुळे अनेकदा चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटते आणि हे अपघात होत असतात.

हे पण वाचा :
शिवसेनेचा बंडखोर आमदार संतोष बांगर यांना मोठा दणका; केली ‘ही’ कारवाई

धक्कादायक ! कोल्हापुरात स्वतःच इंजेक्शन घेऊन डॉक्टर तरुणीची आत्महत्या

Petrol-Diesel Price : पेट्रोल, डिझेलची आज ‘इतकी’ वाढली किंमत?; जाणून घ्या आजचे दर

हिंगोलीत किरकोळ वादातून गाड्या पेटवल्या; भाजप युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षावर गुन्हा दाखल

INS Vikrant ची चौथी चाचणी यशस्वी; भारताच्या सागरी शक्तीत पडणार भर