साताऱ्यातील ऑन्को-लाइफ कॅन्सर सेंटरमध्ये 3 वर्षाच्या चिमुरडीची कर्करोगावर मात

सातारा | साताऱ्यातील अवघ्या तीन वर्षीय प्रीती (नाव बदलले आहे) हेपॅटोब्लास्टोमाचे निदान झाले. हा यकृत कर्करोगाचा एक प्रकार आहे. डॉ सिद्धेश त्र्यंबके ( रेडिएशन व मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट) आणि डॉ. रवी वाटेगावकर (वरिष्ठ सल्लागार वैद्यकीय कर्करोग तज्ञ) ऑन्को-लाइफ कॅन्सर सेंटर यांच्या नेतृत्वाखाली कर्यरत टिमने या चिमुकलीवर यशस्वी उपचार केले. तिच्यावर केमोथेरपी करण्यात आली. ज्यामध्ये 4 चक्रांचा समावेश होता. जिचे प्रत्येक चक्र 5 दिवसांपेक्षा जास्त काळ चालले आणि 3 आठवड्यातून एकदा पुनरावृत्ती केली गेली. केमोथेरपी दरम्यान अनेक गुंतागुंत निर्माण झाल्या होत्या जसे की संसर्गाचा विकास या साऱ्यांचे डॉक्टरांच्या टीमने प्रभावीपणे व्यवस्थापन केले. प्रितिची काळजी तिच्या परिवारासोबतच हॉस्पिटलचे कर्मचारी व व्यवस्थापकीय वर्ग यांनी तिच्यावर उपचारादरम्यान पुरेशी काळजी घेत तिला भरपुर प्रेम दिले. केमोथेरपी पूर्ण झाल्यानंतर, प्रितिला डॉ त्र्यंबके यांनी पेट-सीटीची तपासणी करण्याचा सल्ला दिला. या चिमुकलीने उपचारांना पूर्ण सकारात्मक प्रतिसाद दर्शविला होता

त्यानंतर तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. रूग्णालयात अशा प्रकारची ही पहिलीच बालरोग शस्त्रक्रिया होती. श्री उदय देशमुख, अध्यक्ष ऑन्को-लाइफ कॅन्सर सेंटर आणि श्री सचिन देशमुख, कार्यकारी संचालक,ऑन्को-लाइफ कॅन्सर सेंटर यांनी तिला जीवनदान देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले आणि विविध माध्यमातून तिच्या शस्त्रक्रियेसाठी निधी गोळा करण्यात मोलाची भुमिका निभावली. डॉक्टर मनोज लोखंडे, वरिष्ठ सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट यांच्या नेतृत्वाखालील टिमने कोणत्याही अनुचित गुंतागुंतीशिवाय यकृतातील सर्व जोखमीचा भाग यशस्वीपणे काढून टाकला. तिला शस्त्रक्रियेसाठी दाखल करण्यात आले तेव्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनीही तिचा वाढदिवस देखील याठिकाणी उत्साहात साजरा केला. प्रितिला आता घरी सोडण्यात आले आहे. ती प्रदीर्घ उपचारांसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेली सर्वात कमी वयाची पहिलि रुग्ण आहे आणि तिथल्या सर्व कॅन्सर रुग्णासाठी ती एक प्रेरणा बनली आहे असे डॉ. सिद्धेश त्र्यंबके यांनी स्पष्ट केले.

डॉ. सिद्धेश त्र्यंबके पुढे सांगतात की, हेपॅटोब्लास्टोमा हा बालपणातील सर्वात सामान्य यकृताचा कर्करोग आहे. हा १० लाखापैकी २-३ बालकांना प्रभावित करतो. हे सहसा आयुष्याच्या पहिल्या 3 वर्षांमध्ये उद्भवते आणि यामुळे पोटात वेदना व अस्वस्थता येते.अद्याप हेपॅटोब्लास्टोमाचे नेमके कारण अज्ञात आहे. हिपॅटोब्लास्टोमा असलेली सुमारे 75-80 टक्के मुले उपचरा नंतर किमान् 5 वर्ष निरोगी राहतात. ज्यांना केमोथेरपी आणि शस्त्रक्रियेने लवकर निदान व उपचार केले जातात त्यांच्यामध्ये जगण्याची क्षमता सुमारे 90 टक्के ही असते. तरी सर्व पालकांनी या बद्दल जागरूक राहून वेळेत उपचार घेणे आवश्यक आहे.