विमानातील लघवीप्रकरणी Air India ला 30 लाखांचा दंड, DGCA ची मोठी कारवाई

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या Air India बाबतचे एक प्रकरण चांगलेच गाजते आहे. ज्यामध्ये विमानात लघवी केल्याप्रकरणी शुक्रवारी या एअरलाइनवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. हे जाणून घ्या कि, DGCA कडून नागरी विमान वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी एअर इंडियाला 30 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

याशिवाय तीन महिन्यांसाठी पायलटचे लायसन्स देखील निलंबित करण्यात आले आहे. आपले कर्तव्य पार पाडण्यात अपयशी ठरल्यामुळे पायलटवर ही कारवाई केली गेली आहे. यावेळी विमान नियम 1937 च्या नियम 141 आणि लागू DGCA च्या नागरी उड्डाण नियमांनुसार सदर पायलटवर ठपका ठेवण्यात आला आहे. याशिवाय Air India च्या उड्डाण सेवेतील संचालकाला देखील तीन लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

Air India pee-gate: 'Shankar Mishra had 4 drinks, was asking...,' co-passenger narrates what happened on flight - BusinessToday

DGCA कडून एअर इंडियाला मिळाली नोटीस

या प्रकरणी एका पीडित महिलेने Air India वर वेळीच कारवाई न केल्याचा आणि तडजोड केल्याचा आरोप केला. ज्यानंतर एअर इंडियाला DGCA कडून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. याबाबत DGCA ने एअर इंडियाकडे विचारणा करताना म्हंटले की,”आम्ही तुमच्यावर कारवाई का करू नये ? तुम्ही तुमची जबाबदारी नीट पार पाडली नाही, मात्र न्यायालयीन प्रक्रियेचा विचार करता उत्तर देण्यासाठी तुम्हाला दोन आठवड्यांचा कालावधी दिला जाईल. त्याआधारेच योग्य ती पुढील कारवाई केली जाईल.”

महिलेकडून क्रू मेंबरबाबत तक्रार

एका महिला प्रवाशाने आपल्या तक्रारीत लिहिले की, “AI 102 फ्लाइटमधील बिझनेस क्लासच्या माझ्या प्रवासादरम्यान घडलेल्या एका भयानक घटनेबाबत माझी तीव्र नाराजी व्यक्त करण्यासाठी मी लिहित आहे. आतापर्यंत प्रवास केलेली ही माझी सर्वात खराब फ्लाइट आहे. या फ्लाइटमधील प्रवासा दरम्यान दुपारच्या जेवणानंतर काही वेळातच अचानक लाईट्स बंद करण्यात आल्या. यानंतर मी झोपण्यासाठी तयार होत असताना एक मद्यधुंद अवस्थेतील प्रवाश्याने त्यांच्या सीटवर लघवी केली.

Air India 'pee-gate': Flight incident turns into PR nightmare for airline - BusinessToday

यादरम्यान इतर प्रवाशांनी त्याला तसे थांबवण्याचा प्रयत्न देखील केला, मात्र तो काही ऐकायला तयारच नव्हता. या घटनेबाबत सदर पाहिलेले फ्लाईटमधील केबिन क्रूला असंवेदनशील म्हंटले आहे. त्या पुढे म्हणाल्या की,” यावेळी क्रूकडून त्यांना कपडे बदलण्यासाठी म्हणून फक्त पायजामा आणि चप्पलची जोडी दिली गेली, मात्र त्या कृत्याबाबत सदर पुरुष प्रवाशाविरुद्ध कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.”

7 जानेवारी रोजी बंगळुरू येथून आरोपीला अटक

हे जाणून घ्या कि, गेल्या वर्षी 26 नोव्हेंबरला न्यूयॉर्कहून दिल्लीला येणाऱ्या फ्लाइटमधील बिझनेस क्लासमध्ये बसलेल्या एका 70 वर्षीय महिला प्रवाशावर मद्यधुंद अवस्थेतील शंकर मिश्रा याने लघवी केली होती. याप्रकरणी पोलिसांनी 7 जानेवारी रोजी बेंगळुरू येथून आरोपीला अटक केली होती.

Air India 'pee-gate' case: 'I didn't urinate on complainant,' Shankar Mishra tells Delhi court - BusinessToday

या प्रकरणी मिळालेल्या अधिक माहितीनुसार, घटनेच्या 42 दिवसांनंतर आरोपीला अटक होऊ शकते. मुंबईचा रहिवासी असलेला शंकर सातत्याने फरारी राहत होता, ज्यानंतर त्याच्याविरुद्ध लुकआउट नोटीस जारी करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला त्याच्या मोबाईल लोकेशनच्या आधारे अटक केली. त्याच्याविरुद्ध पोलिसांकडून भादंवि 354,294,509,510 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Air India

अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.airindia.in/

हे पण वाचा :
CIBIL Score म्हणजे काय ??? याचा कर्जाच्या पात्रतेवर कसा परिणाम होतो ते समजून घ्या
HDFC कडून होम लोनवरील व्याज दरात वाढ, आता ग्राहकांना द्यावा लागणार जास्त EMI
Jio च्या ‘या’ प्लॅनमध्ये 1 वर्षाच्या व्हॅलिडिटीसोबत मिळवा अनलिमिटेड कॉलिंग अन् डेटा
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतींत वाढ, जाणून घ्या आजचा नवीन भाव
Ayushman Bharat Yojana : केंद्र सरकारच्या ‘या’ योजनेंतर्गत मिळवा 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार, अशा प्रकारे तपासा पात्रता